आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूरचे 12 दरवाजे उघडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रविवारी सकाळी 11 वाजता हतनूर धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटर उंचीने उघडण्यात आले. यामुळे धरणातून 468 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यापूर्वी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच 12 दरवाजे उघडले आहेत. हतनूरमधील पाणीसाठय़ात पुन्हा वाढ झाल्याने धरणाचे दोन दरवाजे शुक्रवारी उघडण्यात आले होते. मात्र, विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठय़ात शनिवारी पुन्हा वाढ झाल्याने रविवारी सकाळी 11 वाजता 12 दरवाजे अर्धा मीटर उंचीने उघडण्यात आले. यामुळे तापीनदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या चार महिन्यांपासून तापीनदीचे पात्र कोरडेठाक होते. हतनूर धरणाच्या उगमक्षेत्रावर गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापीनदीला हलकासा पूर आला आहे. निसर्गप्रेमींनी नदीपात्र व धरण परिसरातील निसर्ग सौंदर्य न्याहळण्यासाठी धाव घेतली असल्याचे चित्र आहे. तर शहरातील अनेकांनी पावसाळी सहलींच्या नियोजनावरही भर दिला. रविवारी दिवसभर तापीनदी किनार्‍यावर गर्दी झाली होती.