आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूर धरणाचे 35 दरवाजे केले बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस ओसरल्याने हतनूर धरणातील आवक घटली आहे. परिणामी 10 दिवसांपासून खुले असलेले 41 पैकी 35 दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

सध्या सहा दरवाजांमधून 16 हजार 635 क्युसेस विसर्ग होत आहे. हतनूरचे सर्व 41 दरवाजे 23 जुलैला उघडले होते. मात्र, 1 ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला. त्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी झाला आहे. सध्या धरणाची जलपातळी 209.750 मीटर असून आवक मंदावल्याने शुक्रवार आणि शनिवारी 35 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सहा दरवाजांतून विसर्ग सुरू असल्याने तापी नदी सलग दोन आठवड्यांपासून दुथडी भरून वाहत आहे.