आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हतनूर’वर जलविद्युत निर्मिती; कोल्हापूरच्या कंपनीकडे दिले काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर सन 1981 मध्ये उभारण्यात आलेल्या हतनूर अर्थात ‘संत मुक्ताईसागर प्रकल्पा’वर जलसंपदा विभागाकडून दोन मेगावॉट स्थापित क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून ‘बीओटी’ तत्त्वावर पुढील वर्षापासून वीजनिर्मिती शक्य आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने हतनूर धरणावर दोन मेगाव्ॉट वीजनिर्मितीला मार्च 2013 मध्ये मंजुरी दिली आहे. कोल्हापूर येथील मथुरा इन्फ्रास्ट्रर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा प्रकल्प उभारणार आहे. मात्र, जलसंपदा विभागाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह अन्य प्रक्रिया झालेली नाही. पुढील प्रक्रियेत हतनूर धरणाच्या परिसरात मथुरा इन्फ्रास्ट्रर लिमिटेडला 30 वर्षांच्या भाडेकरार (लीज)वर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित’ करा या तत्त्वावर उभ्या राहणार्‍या या प्रकल्पातून पावसाळा आणि उन्हाळ्यात आवर्तन सोडताना दोन मेगावॉट वीजनिर्मिती होणे शक्य आहे.

हतनूर धरणावर पर्यावरणप्रेमींसह अभ्यासकांची वर्षभर गर्दी असते. जलविद्युत प्रकल्पानंतर हतनूरच्या वैभवात भर पडणार आहे. हतनूर धरणावर पक्षी अभयारण्य तसेच इंपोर्टेड बर्ड एरिया (आयबीए) होण्याच्या हालचाली सुरू आहे.

याच धरणावर जलविद्युत निर्मिती होणार असल्याने हतनूरच्या वैभवात भर पडेल. जलसंपदा विभागाने दिलेल्या मंजुरीनंतर आता पुढील प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण होईल. प्रकल्प उभारणीनंतर यंदाच्या पावसाळ्याच हतनूर धरणावर जलविद्युत निर्मितीची शक्यता आहे.

जागा उपलब्ध
हतनूर धरणावर जलविद्युत निर्मितीचा संच कार्यान्वित करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. कोल्हापूर येथील मथुरा इन्फ्रास्ट्रर कंपनी संच उभारणी करेल. या कंपनीला भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. एस.आर.पाटील, शाखा अभियंता, हतनूर धरण

30 वर्षांनंतर काय ?
हतनूर धरणावर 30 वर्षांच्या मुदतीसाठी बीओटी तत्त्वावर जलविद्युत निर्मिती होणार आहे. यानंतर हा प्रकल्प जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात येईल. 1981 मध्ये कार्यान्वित झालेले हतनूर धरण 1986 मध्ये आलेल्या पुरात 35 टक्के गाळाने भरले होते. सध्या या धरणात 40 टक्के गाळ आहे. यामुळे धरणाची साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. दरम्यान, 30 वर्षांनंतर या धरणात किती टक्के गाळ असेल? आणि यानंतर जलविद्युत प्रकल्प जलसंपदा विभाग कसा वापरेल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.