आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटसह वर्दळीचे रस्ते करणार हॉकर्स फ्री!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील हॉकर्सना राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत संरक्षण देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली होती. कें द्र शासनाच्या या धोरणांतर्गत संरक्षण देण्याचे धोरण जाहीर केले हाते. मात्र, हक्काची जागा देताना नागरिकांना अडचणीचे होऊ नये, यासाठी फुले मार्केटसह वर्दळीचे रस्ते हॉकर्स फ्री करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. हरकती स्वीकारल्यानंतर महासभेत या विषयावर शिक्कामोर्तब होईल.
महापालिका प्रशासनातर्फे शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयुक्त संजय कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीची प्राथमिक बैठक सहा महिन्यांपूर्वी झाली होती. या बैठकीत हॉकर्सची नोंदणी करणे, त्यांच्याकडून फी आकारणीसंदर्भात निर्णय घेणे, शहरातील विविध भागात त्यांना हॉकर्स झोनसाठी जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरीत करणे, असे विषय ठरले होते. वाहतूक शाखा, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, हॉकर्सच्या प्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश आहे. नियोजनानुसार प्रशासनातर्फे हॉकर्सची नोंदणी केली असून आतापर्यंत तीन हजारांवर नोंदणी झाली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला 9 लाखांवर उत्पन्न मिळाले आहे. समितीच्या नियोजनानुसार पालिकेच्या अभियंत्यांकडून शहरातील विविध भागातील हॉकर्स झोनसंदर्भात सर्वेक्षण अहवाल मागविले आहेत. या अहवालानुसार फुले मार्केट, सुभाष चौक ते भोईटे शाळेपर्यंतचा चौक, तेथून शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, घाणेकर चौक ते कोंबडीबाजार यासह सुमारे 30 ठिकाणच्या वर्दळीच्या रस्त्यांवरील विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भात प्रशासनातर्फे गोपनीयता बाळगली जात आहे.