धुळे - शहरातील फेरीवाला व्यावसायिकांचा प्रश्न जटिल झाला आहे. मनपा प्रशासनाने तो सोडवण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील फेरीवाला व्यावसायिकांना योग्य जागा व्यवसायासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे काही िदवसांत त्यांना त्या जागेवर जावे लागेल. त्याची मानसिकता त्यांनी तयार करावी. त्यात कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. शहरातील रहदारीचा प्रश्न यातून सुटणार असल्याचे फेरीवाला व्यावसायिकांच्या बैठकीत आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी सांगितले.
आयुक्तांच्या दालनातील सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता शहरातील फेरीवाला व्यावसायिकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी फेरीवाला व्यावसायिक उपस्थित होते. आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी फेरीवाला व्यावसायिकांना सांगितले की, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील व्यावसायिकांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. त्यात भाजीपाला व्यावसायिकांचे प्रमाण मोठे आहे. त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिकही रस्त्याच्या कडेला उभे राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. यातून शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. तसेच व्यावसायिक उरलेला भाजीपाला रस्त्यावरच फेकून तेथे कचरा िनर्माण करतात. त्यामुळे पर्याय म्हणून या फेरीवाला व्यावसायिकांना स्वतंत्र जागा देण्याचा िवचार करण्यात आला; परंतु जागा निश्चित झाली नाही. तर आग्रा रस्त्यावरील व्यावसायिकही दुसरीकडे जाण्यास तयार नाही. त्यावर गुरुवारी झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी स्पष्टपणे सांिगतले की, रस्ता हा वाहतुकीसाठी आहे. तो फेरीवाला व्यावसायिकांनी मोकळा करून द्यावा. त्यासाठी तांत्रिक समिती पर्यायी जागेचा शोध घेईल. त्यावर िनर्णय घेण्यात येऊन त्यांना त्या जागेवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तरी व्यावसायिकांनी तेथे जावे. एकदा पर्यायी जागा दिल्यावर त्यांना रस्तावर उभे राहता येणार नाही. त्यामुळे पर्यायी जागा घेतल्यास त्या व्यावसायिकाला जागा मिळणार नाही. कुणाच्याही रोजगारावर गदा आणण्याची इच्छा नाही. तसेच हाॅकर्स झोन झाल्यावर कुठल्याही रस्त्यावर कुणालाच उभे राहू दिले जाणार नाही. त्यामुळे यापूर्वी झाले ते विसरा आता दुसरीकडे जाण्याची मानसिकता तयार करा, असे या वेळी डाॅ. भोसले यांनी सांगितले.
प्लास्टिक पिशवी दिल्यास दंड
आग्रारस्त्यावरील पाचकंदील परिसरातील भाजीपाला व्यावसायिकांनी कचरा हा कचराकुंडीतच टाकावा. रस्त्यावर घाण टाकू नये. त्याचप्रमाणे कुणीही भाजीपाला इतर वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये. तसे कुणी आढळल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही पिशवीचाच आग्रह करा. त्यावरही आता सतत लक्ष राहणार आहे. शहरातील सगळया दुकानांमधील प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या जात आहेत. नागरिकांनीही या पिशव्या वापरू नये, त्याऐवजी कापडाच्या पिशव्यांचा वापर वाढवावा, असेही ते म्हणाले.
रस्ते मोकळे करा
फेरीवालाव्यावसायिकांच्या परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होईल असे करणार नाही. दिलेल्या जागेवर त्यांनी जावे. ती जागा त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे रस्ते फेरीवालामुक्त करावे, असेही आयुक्तांनी बैठकीत सांगितले. फेरीवाल्यांमुळे रस्ते अडतात. हे सगळयांना दिसते. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही. त्यामुळे
आपली शिस्त आपणच पाळायला हवी. ही काळजी हॉकर्सनेच घ्यायला हवी. त्याशिवाय रस्ते मोकळे होणार नाहीत.