आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यायी जागेकडे ८५ हॉकर्सची पाठ; अतिक्रमण ‘जैसे थे’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हॉकर्सच्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने चित्रा चौक ते गणेश कॉलनी या मार्गावरील ८५ हॉकर्सची नोंदणी करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली. या नवीन जागेवर शनिवारपासून हॉकर्सला स्थलांतर करायचे होते. मात्र, गिऱ्हाइकी मिळण्याच्या भितीपोटी हॉकर्सने पुन्हा एकदा नवीन जागेकडे पाठ फिरवली आहे. 
 
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने गेल्या दीड वर्षांपासून शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करीत आहे. यात विशेष म्हणजे हॉकर्सला पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण आत्तापर्यंत हॉकर्सचे एकाही ठिकाणचे स्थलांतर यशस्वी होऊ शकलेले नाही. चित्रा चौक ते गणेश कॉलनी या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हॉकर्सला शनिवारपासून ट्रॅफिक गार्डनच्या शेजारी असलेली मोकळी जागाव्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने येथे सहा बाय चार फूट आकाराच्या जागांचे वाटप गेल्या आठवड्यात करण्यात आले. त्यानुसार शनिवारपासून हॉकर्सने या नवीन जागेवर व्यवसाय करण्यास सुरुवात करावी, असे ठरले होते. मात्र, शनिवारी ८५ पैकी एकही हॉकर्स नवीन जागेवर येऊ शकला नाही. 
 
शनिवारी नवीन जागेवर हॉकर्सचे स्थलांतर होणार या अपेक्षेने मनपा कर्मचारी दुपारी वाजेपासून हॉकर्सची यादी घेऊन हजर होते. या वेळी हॉकर्सने नवीन जागेवर येऊन फक्त पाहणी केली. काहीवेळ थांबल्यानंतर हॉकर्सने पुन्हा काढता पाय घेतला. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी एका कोपऱ्यात खुर्च्यांवर बसून हॉकर्सची वाट पाहत होते. पण हॉकर्स आल्यामुळे पहिल्या दिवशी नवीन जागा रिकामीच राहिली. आता सोमवारपासून अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
नुसताचखर्च, हॉकर्सचे स्थलांतर शून्य : यापूर्वीमहापालिकेने सुभाष चौक शिवाजी रोड येथील हॉकर्स बीजे मार्केट परिसरात स्थलांतर केले होते. स्थलांतरासाठी मीटिंग, नवीन जागेची स्वच्छता, आखणी, लकी ड्रॉ या सर्व प्रक्रियेसाठी खर्च करण्यात आला. पण शेवटी हॉकर्सने स्थलांतर करता जुन्याच जागेवर व्यवसाय करणे पसंत केले. बळीरामपेठ येथील हॉकर्सवरही अतिक्रमण विभागाने कारवाई केली, हा विषय सध्या न्यायप्रविष्ठ असतानाच आता चित्रा चौक ते गणेश कॉलनीपर्यंतच्या अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा सुचवली आहे. हे स्थलांतरही ठरल्या वेळेत झाले नाही. त्यामुळे पालिकेचा नुसता खर्च होत असून हॉकर्सचे स्थलांतर होत नसल्याची स्थिती आहे. तसेच ख्वाजामियाँ परिसरातील मोकळी जागा देखील हॉकर्ससाठी तयार करून ठेवली आहे. 
 
‘नो हॉकर्स झोन’ फलकाच्या बाजूलाच अतिक्रमण 
महासभेत झालेल्या ठरावाप्रमाणे सुभाष चौक हा ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे या भागात फेरीवाले हॉकर्सला प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही मनपाच्या आदेशाला जुमानता या फलकाच्या बाजूलाच हॉकर्सने अतिक्रमण केल्याचे शनिवारी दिसून आले. 

कपडे विक्रेत्यांनी मागितली मुदत 
फुलेमार्केट परिसरातील जैन मंदिराच्या शेजारी कपडे विक्रेत्यांची १७ दुकाने आहेत. या दुकानांना देखील ट्रॅफिक गार्डन जवळ जागा देण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी बाजाराचा दिवस असल्यामुळे तेवढा दिवस जुन्याच जागेवर व्यवसाय करू देण्याची विनंती त्यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्याकडे केली. अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान यांना सांगून हॉकर्सने शनिवारी जुन्याच जागेवर व्यवसाय केला. हे १७ दुकानदार सोमवारी नवीन जागेवर स्थलांतर करणार असल्याची माहिती खान यांनी दिली आहे. 

टाइम झोनवर स्थलांतर 
ट्रॅफिकगार्डनच्या जागेवर सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत भाजीपाला, फळविक्रेते बसणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे. गोविंदा रिक्षा स्टॉप ते शिवाजी पुतळापर्यंतच्या खाद्य विक्रेत्यांना ही जागा या पूर्वीच देण्यात आली आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...