आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटमधील हाॅकर्सचा कारवाई टाळण्यासाठी मनपा समाेर रास्ता राेकाे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील हाॅकर्सवरील कारवाई टाळण्यासाठी मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात हाॅकर्सने महापालिकेवर माेर्चा काढला हाेता. हाॅकर्सने जाेरदार घाेषणाबाजी करून चक्काजाम अांदाेलन केले. त्यामुळे वाहतुकीचा काहीवेळ खेळखंडाेबा झाला. मात्र, पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात अाली. दरम्यान, पालिकेचे अधिकारी अापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने फक्त निवेदन देऊन माेर्चेकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

 

महापालिका प्रशासनाने टाॅवर ते भिलपुरा चाैक, बळीरामपेठ, शिवाजी राेड, सुभाष चाैक परिसरातील ‘नाे हाॅकर्स झाेन’मध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली अाहे. पाेलिस प्रशासनानेही जास्त वर्दळीचा भाग असलेल्या ठिकाणी हाॅकर्सला परवानगी देता त्या ठिकाणी उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या अाहेत. गेल्या काही दिवसांपासून फुले मार्केट सेंट्रल फुले मार्केटमधीलविक्रेत्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात अाली अाहे. कारवाईमुळे व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याने फुले मार्केटमधील हाॅकर्सने राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष नीलेश पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेवर माेर्चा काढला हाेता.

 

पालिकेसमाेर ठिय्या अांदाेलन : फुलेमार्केटपासून निघालेला माेर्चा पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ अाल्यानंतर पाेलिसांनी अडवला. सतरा मजलीच्या अावारात प्रवेश दिल्याच्या कारणावरून पाेलिसांसाेबतही वाद झाला. प्रवेश नाकारल्यामुळे हाॅकर्सने महापालिकेपासून ते काॅर्पाेरेशन बॅंकेच्या चाैकापर्यंत दाेन्ही बाजूने रस्त्यावर बसत चक्काजाम अांदाेलन सुरू केले. त्यामुळे टाॅवरकडून येणारा रस्ता जाम झाल्याने वाहने गाेलाणी मार्केटकडून वळवण्यात अाली हाेती. हाॅकर्सने दुपारी १२.४० ते १.३० वाजेपर्यंत पालिकेसमाेर ठिय्या अांदाेलन करत जाेरदार घाेषणाबाजी केली. माेर्चात हाॅकर्सच्या लहान मुलांचाही सहभाग हाेता.

 

पालिका प्रशासनाने मागणी फेटाळली : माेर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दुपारी १.३० वाजता अपर अायुक्त राजेश कानडे यांची भेट घेतली. या वेळी निवेदन स्वीकारल्यानंतर कानडे यांनी ‘नाे हाॅकर्स झाेन साेडून’ कुठेही व्यवसाय करा, अशी सूचना केली. तसेच हाॅकर्सची फुले मार्केटमध्ये कारवाई करण्याची मागणी फेटाळून लावत ‘नाे हाॅकर्स झाेन’मध्ये कारवाई यापुढेही सुरूच राहिल. पंधरा दिवसात बायाेमेट्रीक पध्दतीने हाॅकर्सचे सर्वेक्षण सुरू हाेणार अाहे. त्यामुळे ‘नाे हाॅकर्स झाेन’मध्ये व्यवसाय करता शहरात कुठेही व्यवसाय करा, असे सांगितले. या वेळी हाॅकर्सने दुकानांचा लिलाव झाला तर अाम्हालाही त्यात सहभागी हाेऊ द्यावे, अशी मागणी केली.

 

लवकरच फेरीवाल्यांसाठी जागा देणार:  हाॅकर्सचा ताे ज्या ठिकाणी व्यवसाय करताेय त्या ठिकाणाचा जीपीएस सिस्टिमद्वारे फाेटाे काढला जाणार अाहे. दीड महिन्यात शहरातील फेरीवाल्यांसाठी व्यवसाय करायला जागा निश्चित केल्या जाणार अाहेत. तसेच एकाच ठिकाणी सगळ्यांना जागा देता शहरातील वेगवेगळ्या भागात जागा दिल्या जातील. वाहतूक अपघाताची शक्यता असलेल्या भागात परवानगी मिळणार नाही. शनिपेठेत पार्किंगच्या दृष्टीने लवकरच पी , पी ची अंमलबजावणी पाेलिस प्रशासन करणार अाहे. फुले मार्केटमधील पाथ वे हा नागरिकांच्या वापरासाठी असून त्यावर व्यवसाय करू दिला जाणार नाही, असेही कानडे म्हणाले.

 

दाेन जागांसाठी अाग्रह
फुलेमार्केटमध्ये व्यवसाय करण्यास बंदी घातली जात असल्याने नगरपालिकेची जागा साने गुरूजी रुग्णालयाच्या जागेचा पर्याय माेर्चेकऱ्यांनी पालिका प्रशासनासमाेर ठेवला. या दाेन्ही जागांवर बसण्याची परवनागी दिल्यास वाहतुकीलाही अडचण येणार नाही मार्केटमधील काेंडी सुटेल, अशी भूमिका हाॅकर्स संघटनेचे अध्यक्ष नंदू पाटील यांनी मांडली. तसेच जाेपर्यंत हाॅकर्स झाेन निश्चित हाेत नाही तसेच समिती गठीत केली जात नाही, ताेपर्यंत कारवाई करण्याची मागणी केली.

 

मग अतिक्रमीत दुकानेही ताेडा
फुले मार्केटमध्ये हाॅकर्सला विराेध केला जाताे, त्यांचे अतिक्रमण पालिकेला दिसते मग सेंट्रल फुले मार्केटच्या अावारात दुकाने बांधून त्याचे अतिक्रमण का दिसत नाही. हाॅकर्सवर कारवाई करतात मग पक्के अतिक्रमणही काढणार का? असा प्रश्न पाटील यांनी केला. त्यावर तुम्ही तक्रार करा अाम्ही पुढचे बघू, असे उत्तर मनपाच्यावतीने देण्यात अाले.

 

डीवायएसपींसाेबत शाब्दिक चकमक
महापालिकेतमाेर्चेकऱ्यांना प्रवेश नाकारल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष नीलेश पाटील यांचा डीवायएसपी सचिन सांगळे यांच्यासाेबत शाब्दिक चकमक झाली. सांगळेंनी पाटील यांना नम्रतेने बाेलण्याची सूचना केली. अावाज वाढवून बाेलू नये, अशा शब्दात ताकीद दिली. तर पाटील यांनीही हाॅकर्सवर दबाव अाणत असल्याचा अाराेप केला. या वेळी शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, निरीक्षक प्रवीण वाडिले पाेलिस कर्मचारी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...