आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Head Master News In Matathi, School Nutrition Scheame Ai Jalgaon, Divya Marathi,

मुख्याध्यापकांची शालेय पोषण आहारातून होणार सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेय पोषण आहार योजनेचे काम बचत गटांकडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जबाबदारीतून आता मुख्याध्यापकांची सुटका झाली आहे. मात्र, निकृष्ट दर्जाचा आहार, विषबाधेसह शिल्लक माल व नोंदी केलेल्या मालात तफावत आढळल्यास कारवाई कुणावर करणार? हा महत्त्वाचा प्रश्‍न पुढे आला आहे.
शालेय पोषण आहारासह अन्य जबाबदार्‍या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आल्या आहेत. विशेष करून शालेय पोषण आहाराच्या कामात मुख्याध्यापक वैतागले आहेत. त्यांच्याकडून हे काम काढून घेण्यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
निवडणुकीच्या तोंडावर शासनाने मुख्याध्यापकांच्या बाजूने निर्णय घेत त्यांच्याकडून पोषण आहाराचे काम काढून घेतले आहे. आता ही जबाबदारी बचत गटाकडे दिली आहे. ग्रामीण भागातील शाळांत शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी बचत गटाची निवड शाळा व्यवस्थापन समितीने करावी तर स्वयंपाकी मदतनिसाची निवड संबंधित बचत गटाने करावी. मालाची मागणी नोंदवणे, माल तपासून घेणे व मालाच्या नोंदी घेणे ही कामे बचत गटाने करावीत, अशा सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
बचत गटांना दिले काम
बचत गटांवर काय कारवाई ?
बचत गटावर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून काम काढण्याबरोबरच त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याव्यतिरिक्त दुसरी कोणती कारवाई करणार? असा प्रश्‍न जाणकारांकडून उपस्थित केला जातो आहे. या माध्यमातून मुलांच्या आरोग्याशी धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापक कारवाईच्या भीतीने योजनेचे काटेकोरपणे पालन करीत होते. मुख्याध्यापकांकडून हे काम काढताना शासनाने पर्यायी सक्षम यंत्रणा उभी करायला हवी, अशा प्रतिक्रिया जाणकारांकडून उमटत आहेत.