आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून चार दिवस ‘आरोग्य महाकुंभा’चे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात शनिवारपासून चारदिवसीय महाआरोग्य शिबिर अर्थात ‘महाकुंभा’ला प्रारंभ होत आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आ हे. या शिबिरासाठी आ तापर्यंत जिल्हाभरातून ५५ हजार रुग्णांनी नोंदणी केली आ हे. शुक्रवारी सकाळपासून जिल्हाभरातून रुग्ण शहरात येण्यास सुरुवात झाली. तसेच नागपूर, पुणे मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचा ताफादेखील दाखल झाला आ हे. खान्देश सेंट्रल येथे हे शिबिर होणार असून, या परिसराला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे रूप प्राप्त झाले आहे.
महाआरोग्य शिबिरास सुमारे ५५ हजार रुग्ण येण्याची अपेक्षा असल्याने आयोजकांनी जोरदार तयारी करून ठेवली आ हे. २५०० कार्यकर्ते २५ समित्यांवर शिबिराची जबाबदारी सोपवण्यात आ ली आ हे. भाजपमधील महाजन गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, खान्देश विकास आ घाडीचे नगरसेवक कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आ णि महाजन यांचे इतर पक्षांमधील मित्र, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, व्यापारी, व्यावसायिकांनी या शिबिरासाठी मोठे योगदान दिले आ हे. शहरातील अनेक डॉक्टरदेखील येथे जातीने उपस्थित राहणार आ हेत. रुग्णांची प्राथमिक नोंदणी झालेली असल्याने उपचारासाठी वर्गवारी करणे सोपे झाले असून, त्या दृष्टिकोनातून आ योजकांनी नियोजनावर भर दिला आहे. मध्यवर्ती कार्यालयात मिळेल मदत : शिबिरस्थळीउद्घाटनासाठी उभारण्यात आ लेल्या मंडपाजवळच शिबिराचे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आ ले आ हे. पूर्वतपासणी झालेल्या रुग्णांना डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन (औषधांची चिठ्ठी) लिहून दिल्या आ हेत. ती चिठ्ठी या मध्यवर्ती कार्यालयात दाखवल्यानंतर तेथून स्वयंसेवक त्या-त्या रुग्णाला संबंधित तपासणी कक्षाकडे घेऊन जातील. संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर रुग्णांना बाहेर सोडले जाईल. औषधे लिहून दिलेल्या रुग्णांना त्याच ठिकाणी उभारण्यात आ लेल्या मेडिकलमध्ये मोफत औषधे दिली जातील. तसेच रक्ततपासणी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन आ दी करण्याचा सल्ला दिलेल्या रुग्णांना स्वयंसेवक संबंधित कक्षात घेऊन जातील. निदान झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना स्वयंसेवक शस्त्रक्रिया केल्या जात असलेल्या रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करतील. जिल्हा सामान्य रुग्णालय, गोदावरी हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केल्या जातील.

जेवणाची व्यवस्था : शिबिरातआ लेले रुग्ण त्यांच्या नातेवाइकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आ ली आ हे. खान्देश सेंट्रल मॉलच्या इमारतीमागे त्यासाठी स्वतंत्र ‘अन्नपूर्णा कक्ष’ उभारण्यात आ ला आ हे. या कक्षामध्ये सर्व शिबिरार्थींची जेवणाची व्यवस्था केली आ हे.
तपासणीझालेले रुग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल : तपासणीनंतरनिदान झालेले ग्रामीण भागातील अनेक रुग्ण शुक्रवारी दुपारीच शहरात दाखल झाले. खान्देश सेंट्रलसह विविध ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आ ली होती.

गोदावरीत रुग्णांची प्रचंड गर्दी : महाआ रोग्यशिबिरात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी शुक्रवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. तसेच शस्त्रक्रियेसाठी मुंबई पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टराचा ताफा गोदावरीत दाखल झाला आ हे. पथकातील डॉक्टरांनी रुग्णालयाची पाहणी केली. या पथकाला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी संपूर्ण माहिती दिली.

२०० कार्यकर्तेस्वच्छतेसाठी सज्ज
०२ हजाररक्तसंकलनाची व्यवस्था
२०० वाहनांचीरुग्णांसाठी व्यवस्था
३०० केमिस्टकडून औषधांचे वितरण
०६ प्रमुखकक्ष
०१ समन्वयसमिती
४० रुग्णवाहिकांचीस्वतंत्र व्यवस्था
०४ रुग्णालयांमध्येहोणार शस्त्रक्रिया
०५ ट्रक औषधे वितरणाचे नियोजन
६३ प्रकारचेबाह्यरुग्ण तपासणी कक्ष
२५०० स्वयंसेवक
२५ विविधसमित्या

महाजन, डॉ.लहानेंनी घेतला आढावा
जलसंपदामंत्री गिरीश महाजन डॉ.तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी दुपारी वाजता खान्देश सेंट्रल येथे आ ढावा घेऊन विविध समित्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी खासदार ए.टी.पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार उन्मेष पाटील, गोविंद अग्रवाल, रामेश्वर नाईक आ दी उपस्थित होते. आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांकडून चिडचिड, संताप होणार आ हे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना संयमाने विचारणा करून मदत करावी. कार्यकर्त्यांच्या शिस्तीवरच शिबिराचे यश अवलंबून असल्याने काळजी घेण्याचा सल्ला डॉ.लहाने यांनी दिला. या दोन-तीन दिवसांत कार्यकर्त्यांनी शिस्तीने काम करण्याचे आ वाहनही गिरीश महाजन यांनी केले.
खान्देश सेंट्रल येथे आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. तात्याराव लहाने. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन इतर पदाधिकारी.