आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य निरीक्षकास धक्काबुक्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-पालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांना उशिरा आल्यासंदर्भात हटकल्याच्या कारणावरून आरोग्य निरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आली. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील पालिकेच्या युनिट कार्यालयात शनिवारी सकाळी 7.45 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी आयुक्तांनी आरोग्य अधिकार्‍यांकडून अहवाल मागविला आहे.

आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या कामाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. मुखर्जी उद्यानातील युनिट क्रमांक 3 मध्ये कार्यरत असलेले आरोग्य विभागातील प्रदीप घेंगट, सोनू चिरावंडे, विकास कसबे, विजय कंडारे, देवचंद नाडे, सतीश पवार हे कर्मचारी सकाळी 7 वाजता कामावर हजर झाले. उशीरा का आले, असे त्यांना हटकल्याने त्यांना राग आल्याचे आरोग्य निरीक्षक एस.टी.चौधरी यांचे म्हणणे आहे. या गोष्टीचा राग येऊन कर्मचारी व आरोग्य निरीक्षक यांच्यात शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर कर्मचारी शहर पोलिस ठाण्यात जाऊन आपणास जातिवाचक बोलल्याने निरीक्षकांवर अँट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करू लागले. निरीक्षकही त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनीही मारहाण झाल्याची तक्रार नोंदविण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिस स्थानकात पालिका अधिकारी व आरोग्य कर्मचार्‍यांची मोठी गर्दी झाली होती. दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात आल्याने कोणीही तक्रार दाखल केली नाही.

अहवाल सादर करण्याचे आदेश

आरोग्य निरीक्षक व कर्मचार्‍यांमध्ये झालेल्या वादप्रकरणी आरोग्य अधिकारी विकास पाटील यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोषीवर कारवाई होईल. संजय कापडणीस, आयुक्त