आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi, Smartphone, Gadgets, Divya Marathi,Jalgaon

Smartphone अतिवापराने डोळ्यांना धोका;स्क्रीनमधला निळा प्रकाश हानिकारक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सध्याच्या जगात संगणक, टीव्ही आणि मोबाइल किंवा स्मार्टफोन या दैनंदिन गरजेच्या वस्तू बनल्या आहेत. मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास ते घातक ठरते. भारतातील 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेले बहुसंख्य तरुण स्मार्टफोनचा दिवसातून 32 वेळा वापर करतात. इतक्या वापरामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास संभवू शकतो. सध्या दिवसरात्र तरुण आपल्या मोबाइलवर गुंतलेले असतात. आजकाल लहान मुलांपासून ते चाळिशी उलटलेल्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाइलच्या आहारी गेला आहे. आधुनिकतेच्या हायफाय लाइफस्टाइल स्मार्टफोन आता अविभाज्य घटक बनला आहे. मात्र, हाच स्मार्टफोन स्मार्टरित्या तुम्हाला हानी पोहोचवतो आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराने डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. फक्त डोळ्यांवरच सीमित न राहता शरीराला देखील हा फोन हानिकारक ठरतो आहे.

तज्ज्ञ अँडी हेपवर्थ काय म्हणतात ते वाचा पुढे....