आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्यांवर नियंत्रण आरोग्य अधिकार्‍यांचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- काम न करता दांड्या मारण्याचे प्रमाण आरोग्य विभागात अधिक आहे. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी यापुढे किरकोळ रजा आरोग्य निरीक्षकांच्या सहीने, तर अर्जित आणि वैद्यकीय रजा आरोग्य अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने मंजूर करण्याचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत.
आरोग्य विभागाची आढावा बैठक शुक्रवारी महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पालिकेकडे आरोग्य विभागात कायम कर्मचार्‍यांची संख्या मोठी दिसत असली तरी, प्रत्यक्षात कामे होत नसल्याची व्यथा नगरसेवकांनी मांडली. तसेच कामात बदल सांगताच कर्मचारी रजेवर जात असल्याची बाबही काही निरीक्षकांनी सांगितली. त्यावर संतप्त होत आयुक्तांनी कर्मचार्‍यांना यापुढे आस्थापना विभागातून रजा मंजूर करण्यात येऊ नये. काही रजेच्या मुद्यांवर ते स्वत: निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.
अस्वच्छता पसरवणार्‍या हॉटेलचालकांवर लक्ष
अस्वच्छता पसरवणार्‍या सर्वच हॉटेलचालकांवर लक्ष ठेवा. तसेच हॉटेलमधील शिल्लक अन्न व इतर वस्तू इतरत्र फेकून अस्वच्छता पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करा. दंड देण्यास नकार देणार्‍या हॉटेलचालकांच्या मालमत्ता करात दंडाची रक्कम समाविष्ट करून ती वसूल करण्यात येईल, अशी सूचना आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिली.