आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंची बदनामी: दमानिया यांच्यावर दावा दाखलसाठी युक्तिवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर साेमवारी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जुलै राेजी हाेणार अाहे. त्या वेळी समन्स बजवायचा किंवा नाही? यावर निर्णय हाेणार अाहे.

माजी मंत्री खडसे यांच्याविराेधात अाराेप करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा यासाठी भाजप अल्पसंख्याक अाघाडीचे महानगर अध्यक्ष इरफान माेहंमद फते माेहंमद यांनी साेमवारी न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात अर्जदाखल केला. त्यावर साेमवारी युक्तिवाद झाला. त्यात फिर्यादीला अर्ज दाखल करण्याचा अधिकार अाहे किंवा नाही? यावर सुरुवातीला अॅड. व्ही. एच. पाटील, अॅड. हारूल देवरे, अॅड. अानंद मुजुमदार यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात अर्ज सादर केला. त्यात वर्तमानपत्रांत अालेल्या मुक्ताई साखर कारखान्याच्या संदर्भातील बातमीत दमानिया यांनी केलेले अाराेप, खडसेंचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर यांची विदेशी लिमाेझिन कार बेकायदेशीर बाळगली.
पुढे वाचा... मात्र, खडसेंच्या दबावामुळे कारवाई झाली नसल्याचा अाराेप, तापी महामंडळात काेट्यवधींचा भ्रष्टाचार करून खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंच्या नावे
बातम्या आणखी आहेत...