आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमृत्यूप्रकरणी युक्तिवादास सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हासामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या वर्षभरात ४४० बालकांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. लाळीकर यांच्यासह सात जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी न्यायालयात दाखल अर्जावर शनिवारपासून न्यायाधीश संजय कुळकर्णी यांच्या न्यायालयात युक्तिवादास सुरुवात झाली.
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी १९ जानेवारी रोजी न्यायालयात हा अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात गुप्ता यांच्यातर्फे अॅड. गिरीश नागोरी हे काम पाहत आहेत. पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी हाेणार आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.. एस. एन. लाळीकर यांच्यासह डॉ. मंदार काळे, डॉ. इंगळे, डॉ. हिरा दामले, डॉ. अभय जोशी, डॉ.स्मिता मुंडे आणि डॉ. उमेश वानखेडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा हा अर्ज आहे.