आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- मुंबई येथील रुग्णालयांमध्ये हृदयरुग्णांवर बायो अँब्सॉर्बेबल हार्ट स्टेंट लावण्यास सुरुवात झाली आहे. जे हार्ट ब्लॉकेजवरील उपचारासाठी प्रभावी तंत्रज्ञान मानले जाते. नैसर्गिक तत्त्वाचा वापर करून संशोधन केलेले बायोअँब्सॉर्बेबल हार्ट स्टेंट तंत्रज्ञान आहे. मुंबईतील जसलोक, बॉम्बे आणि सुराणा हॉस्पिटलमध्ये निवड केलेल्या रुग्णांवर गेल्या डिसेंबरमध्ये या स्टेंटद्वारे यशस्वी उपचार झाल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निर्मल र्शीर्शीमाळ यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. जळगावातदेखील या स्टेंटचा वापर शक्य आहे. यात यशाची खात्री अधिक, तर इन्फेक्शनची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
18 महिन्यांत शरीरात विरघळून जाणारे आणि इन्फेक्शनची शक्यता शून्यावर आल्याने बायोअँब्सॉर्बेबल स्टेंट कार्डिओ सर्जरीच्या क्षेत्रात नवीन क्रांती घेऊन आले आहे. नव्या स्टेंटबाबत माहिती देताना डॉ. र्शीर्शीमाळ म्हणाले की, मेटल स्टेंटचे धोके लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी नैसर्गिक तत्त्वाचा वापर करून शरीरात विरघळणारी स्टेंट तयार केली आहे. या स्टेंट फॉरेन बॉडीप्रमाणे आयुष्यभर शरीरात राहणार नाही. बायोअँब्सार्बेबल असल्याने या स्टेंट शरीरामध्ये आपोआप विरघळणार्या आहेत. रुग्णांवर यशस्वी प्रयोगानंतर ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने बायोरिसोर्सेबल व्हॅस्क्युलर स्कॅफोल्ड स्टेंटद्वारे उपचार सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये मुंबईत या पद्धतीने शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील डॉक्टरांनादेखील या स्टेंटची जिज्ञासा वाढली असून, त्याच्या उपयोगितेमुळे प्रतीक्षा आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शहरात दरवर्षी 200 ते 250 हार्ट स्टेंटे्सची गरज भासते. बायोअँब्सॉर्बेबल स्टेंटस रेग्युलर मेटल स्टेट्सपेक्षा जास्त उपयोगी आणि सोयीचा ठरेल. शहरात काही ठिकाणी नॉनमेडिकेटेड स्टेंट्सदेखील वापरले जात आहे. यात इन्फेक्शनची शक्यता 20 टक्के आहे. बायोअँब्सॉर्बेबल स्टेंट पॉलिलॅक्टॉइडपासून बनविले जाते. ते मानवी शरीरात सहज विरघळतात. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता 3.5 टक्क्यांपर्यंत असते. शहरात मागणीनुसारच हे स्टेंट दाखल होतील. कारण रेग्युलरपेक्षा याची किंमत तीन पट अधिक आहे.
कॉस्ट फॅक्टर
सामान्य स्टेंटची किंमत 40 ते 75 हजारांदरम्यान आहे. ड्रगवाले स्टेंट एक लाख 25 हजारांपर्यंत आहेत. बायोअँब्सॉर्बेबल स्टेंटची किंमत तीन लाख रुपयांपर्यत आहे. त्यामुळे जळगावात त्याची मागणी कमी राहू शकते. दिल्ली, मुंबईतील काही रुग्णांलयांमध्ये या स्टेंटचा वापर झाला आहे. डॉ. र्शीर्शीमाळ यांच्या म्हणण्यानुसार, मेटल स्टेंटच्या वापरामुळे इन्फेक्शनचे प्रमाण आणि स्टेंट टाकल्यानंतर होणार्या ब्लॉकेजचे प्रमाण 2 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढले होते. शरीर विज्ञान आणि नैसर्गिक तत्त्वांचा विचार करून शास्त्रज्ञांनी बायोअँब्सार्बेबल स्टेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी रुग्णांची मानसिक तयारी आणि निवड याबाबी महत्त्वाच्या आहेत.
असे आहेत फायदे
> मेटल स्टेंटस नेहमी शरीरात राहील. मात्र, अँब्सार्ब-बीपीएस फक्त ब्लड वेसलचे हिल होण्यापर्यंतच शरीरात राहील.
मेटल स्टेंटमुळे ब्लड वेसलचा आकार पुन्हा बदलू शकतो. त्यामुळे ब्लॉकेजचा धोका कायम राहतो. नवीन स्टेंट शरीरात विरघळल्यानंतरही ब्लड वेसलचा आकार कायम राहील.
> इम्युन सिस्टिमवर कोणताही फरक पडणार नाही.
अशा येतील अडचणी
> नवीन स्टेंटचा दीर्घकाळ अभ्यास होणे बाकी आहे.
> स्टेंट मेटॅलिक नसल्याने ते स्टोअर करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज भासेल.
>या स्टेंट इंप्लान्ट करण्यासाठी रुग्णांची निवड विचारपूर्वक करावी लागेल.
आतापर्यंतचे तंत्रज्ञान
1970 या दशकात अँजिओप्लास्टीमध्ये बलूनचा वापर व्हायचा.
1990 या दशकात मेटल स्टेंट आले.
2001 मेडिसिनल स्टेंट्सचा वापर सुरु.
2012 डिसेंबरमध्ये देशात बायोअँब्सार्बेबल स्टेंटची सुरुवात झाली.
ट्रायलनंतर वापर
18 महिन्यांत शरीरात विरघळणार अँब्सार्बेबल स्टेंट
30 देशांमध्ये 3000 रुग्णांवर प्रायोगिक उपचार
100 रुग्णांवर भारतात प्रयोग
250 स्टेंटची दर वर्षाला मागणी
येथे झाला वापर
मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये डॉ. अश्विन मेहता, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. के. गोयल, सुराणा हॉस्पिटलमध्ये डॉ. विकी शहा यांनी डिसेंबरमध्ये प्रथम या स्टेंटचा वापर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.