जळगाव - एेनपावसाळ्यात पाऊस बेपता झाल्याने शहरात उन्हाळ्यासारखी स्थिती आहे. श्रावण महिन्यातदेखील तापमान ३० अंशांपुढे आहे. रात्रीचे तापमानदेखील २५ अंशांपेक्षा खाली येत नसल्याने वाढत्या उकाड्याने जळगावकारांना घामाच्या धारांनी बेजार केले आहे. वातावरणातील या बदलाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे अनेक साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे.
गेल्या तीन महिन्यांत पावसाळ्याच्या काळात अपेक्षित पाऊस झाल्यामुळे जमिनीची धूप थांबलेली नाही. उकाडा कायम आहे. वातावरणातील बदलाचा थेट परिणाम होऊन उकाडा आणखीनच वाढत आहे. श्रावणात तरी वातावरणात गारवा परतेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. पाऊस नसल्याने रात्रीच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. बाजारपेठ, अर्थकारण, जनजीवन यावरदेखील या परिस्थितीचा परिणाम जाणवत असल्याची स्थिती आहे. आरोग्याचा समस्या वाढल्या असून डॉक्टरांकडे रुग्णांच्या रांगा वाढल्या आहेत. डास, चिलटे यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. शहरातील स्वच्छतेच्या अभावामुळे वाढत असलेल्या घाणीमुळे या समस्येत भर पडत असल्याचे चित्र आहे.
ऑगस्ट महिन्यातील तापमानाचा चढ-उतार
खान्देशातउन्हाळ्याप्रमाणे ऑक्टोबर हीटदेखील त्रासदायक असते. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटी उन्हाचा चटका वाढतो. त्या तुलनेत जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये वातावरण अल्हाददायी असते. मात्र, गेल्या दोन वर्षांत ऑगस्ट महिनादेखील उन्हाळ्याप्रमाणे तापत आहे. गेल्यावर्षी पावसाअभावी ऑगस्ट महिन्यात २५ ते २८ अंशांपर्यंत तापमान होते. यावर्षी रात्रीचे तापमान २५ ते २७ अंशांपर्यंत अाहे. दिवसादेखील पारा ३० ते ३२ अंशांपर्यंत जात अाहे. त्यामुळे प्रचंड उकाडा हाेत असून नागरिक घामांच्या धारांनी हैराण झाले आहेत.
या तारखा लक्षवेधी
१०ऑक्टो. १९६६ ४०.४° से.
जुलै १९९३ ४३.९° से.
२१ ऑगस्ट २०१५ ३०° से.
साथीचे आजार बळावले नसल्याचा मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दावा
जळगावशहरामध्येसर्दी, खोकला, मलेरिया आदी साथीचे आजार बळावले नसल्याचा दावा मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी एस.जे.पांडे यांनी केला आहे. शहरात मलेरियाने एकही मृत्यू झाल्याची मनपाकडे नोंद आहे. एखाद्या रुग्णाला मलेरिया झाला असल्याचा अहवालही नसल्याचे त्यांनी सांगितले. मलेरिया, डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी पाणी साठ्यांमध्ये अळीनाशक फवारण्यात आले आहे. तसेच बीटीआयची फवारणीही सुरू आहे. बागवान मोहल्ल्यात कावीळची साथ पसरली होती; त्यानंतर साथीचे आजारांचे रुग्ण आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मनपा दवाखान्यांमध्ये मलेरिया डेंग्यू या आजारांचा सामना करण्यासाठी अॅबेट, पायरोप्झाम ही अळीनाशक, पाच फॉगिंग मशीन तसे आठ महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध आहे.
कफ, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली
^सर्दी, कफ, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली अाहे. तापमान वाढल्याने घामाद्वारे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी हाेत अाहे. पाणी कमी प्यायल्यामुळे लघवीचे अाजार, पाेटदुखी अाणि काही प्रमाणात मूतखड्याच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते. थकवा, डाेकेदुखी, चक्कर येत असल्याच्याही तक्रारी अाहेत. त्यामुळे नागरिकांनी जास्त पाणी प्यावे, शिळे अाणि उघड्यावरील अन्न सेवन करू नये.
-डाॅ.धनराजचाैधरी, जनरलप्रक्टिशनर्स'
जळगाव मारुतीपेठेतीलएका विवाहितेचा शुक्रवारी पहाटे २.३० वाजता एका खासगी रुग्णालयात मलेरियाने मृत्यू झाला. नेहा अनुप भावसार (वय २५) यांना थंडी, ताप उलट्याचा त्रास होत असल्याने त्यांना १७ ऑगस्ट रोजी दुपारी वाजेच्या सुमारास जिल्हापेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, नेहाला मलेरिया झाला हाेता त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची मािहती पती अनुप भावसार यांनी ‘िदव्य मराठी’ला िदली.