आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुवर्णनगरी’ बनली ‘आरोग्यनगरी’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खान्देशसेंट्रल माॅल येथे अायाेजित केलेल्या महाअाराेग्य शिबिरात ३५ हजार रुग्णांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी निवड केलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय, अार्किड हाॅस्पिटल, डाॅ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय अाणि गणपती हाॅस्पिटल येथे दाखल केले. पहिल्या दिवशी दाेन ट्रक अाैषधांचे वितरण करण्यात अाले. येत्या तीन दिवसांत उर्वरित रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया अाणि अाैषधांचे वितरण केले जाणार अाहे. येथे शस्त्रक्रिया हाेऊ शकणाऱ्या रुग्णांवर मुंबईमध्ये उपचार हाेणार अाहेत.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अायाेजित केलेल्या महाअाराेग्य शिबिरात शुक्रवारी सायंकाळीच रुग्ण दाखल झाले हाेते. शनिवारी सकाळी वाजेपासून रुग्णांच्या तपासणीला प्रारंभ झाला. प्राथमिक तपासणी झालेल्या रुग्णांचे फाइल तयार करून संबंधित तज्ज्ञ डाॅक्टरांकडे तपासणी करण्यात अाली. डाॅक्टरांच्या सल्ल्यानंतर विविध तपासण्या, अाैषध वितरण करून रुग्णांना साेडण्यात अाले. डाॅ.तात्याराव लहाने, डाॅ.विकास महात्मे, डाॅ.रागिनी पारेख यांच्या विविध टीमने तब्बल २० हजार रुग्णांची तपासणी केली.

पंडित दीनदयाळ उपाध्याय कक्षात नेत्र, दंत अाणि कर्करोगाशी संबंधित, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कक्षात सामान्य शस्त्रक्रिया, स्त्री राेगाशी संबंधित, मूत्रविकार, अस्थिरुग्ण, प्लास्टिक सर्जरी, कवयित्री बहिणाबाई कक्षात बालरुग्ण किडनीशी संबंधित डाॅक्टरांनी तपासण्या केल्या. डॉ. अब्दुल कलाम कक्षात हृदयरोग, छाती, क्षयरोग, नाक-कान- घसा, त्वचा रोग, मेंदूशी संबंधित अाजाराच्या तपासण्या केल्या. खान्देश सेंट्रल मॉलच्या तळमजल्यात औषधालय पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वाराजवळ रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

अाराेग्य शिबिरात दिवसात १२०० बाटल्या रक्त संकलन
महाअाराेग्य शिबिरात गेल्या नऊ दिवसांत तब्बल हजार २०० जणांनी रक्तदान केले. शनिवारी या रक्तदान शिबिराला माेठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. खान्देश सेंट्रल माॅलच्या तळमजल्यावर रक्तदानासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात अाली हाेती. या वेळी तुळजाई संस्था लाेकसंवाद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. भूषण लाडवंजारी, शिरीष तायडे दर्शन लाेखंडे यांनी रक्तदान करून शिबिराचा समाराेप केला. दरम्यान, शनिवारी अनेक रुग्णांवर उपचार केले. रविवारी सकाळपासून या रुग्णांवर शस्त्रक्रियेला प्रारंभ केला जाणार अाहे. इतर अाजाराशी संबंधित रुग्णांना अार्किड अाणि गणपती हाॅस्पिटलमध्ये दाखल केले अाहे.

राजकीय कार्यकर्त्यांमुळे नियाेजनात राहिल्या त्रुटी
अाराेग्य शिबिरासाठी नियुक्त केलेल्या काही राजकीय कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे दर्शन घडवल्याने रुग्णांचे हाल झाले. नियाेजनानुसार नियुक्तीच्या ठिकाणी दिलेले कार्यकर्ते सकाळी काही वेळातच जागेवरून गायब झाले. शिबिरात येणाऱ्या रुग्णांना याेग्य जागेवर पाेहचविण्यासाठी शाेधाशाेध करावी लागली. विचारणा करूनही रुग्णांना याेग्य कक्षात पाेहचविण्याचे काम कार्यकर्त्यांकडून झाले नाही. त्यामुळे रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला.

रुग्णालयात शस्त्रक्रिया
महाअाराेग्य शिबिरात व्यासपीठावर येण्यासाठी मुख्यमंत्र्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केला हाेता. मात्र, कार्यक्रमस्थळी येताच मुख्यमंत्र्यांनी नागरिकांसाठी तयार केलेल्या मार्गाचा वापर केला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. तर दुसऱ्या छायाचित्रात अाराेग्य तपासणीसाठी अालेले पुरूष महिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रात्री घेतली रुग्णांची भेट
जळगावात मुक्कामी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १०.३० वाजता गणपती हाॅस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात अालेल्या रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या व्यवस्थेबाबत चाैकशी केली. दरम्यान, नेत्रविकाराशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यासाठी सायंकाळपर्यंत तपासण्या करण्यात अालेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले.