आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा: चक्रीवादळाचा तडाखा, केळीबाग जमिनदोस्त; शेतकर्‍याने लावला कपाळाला हात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा- काल (शुक्रवारी) रात्री आठ वाजता गुळ मध्यम प्रकल्प व वर्डी गावापर्यंत चक्रीवादळ, विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. वर्डी गावात दहा ते पंधरा मिनिटे गारांचा पाऊस झाला.

या चक्रीवादाळात तालुक्यातील नरवाडे येथील शेतकरी योगराज शांताराम माळी यांच्या शेतातील उभ्या केळी पीकाचे प्रचंड नुकसान झाला. पाच हजार खोडापैकी ऐंशी टक्के केळीचे नुकसान होऊन सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याची माहिती पंचनामा करणाऱ्या कृषी शहायक आर.डी.पाटील यांनी दिली आहे.

त्याचबरोबर आडगाव येथील संतोष नामदेव पाटील यांच्या शेतातील केळी जमिनदोस्त झाली. दोन्ही शेतकऱ्याचे शेतीचे पंचनामे कृषी अधिकाऱ्यांनी केले आहेत.

अन् डोक्याला लावला हात...
योगराज माळी हे सकाळी आठ वाजता नेहमी प्रमाणे शेती कामाला गेले असतांना त्यांना आपल्या एक हेक्टर क्षेत्रातील उभी केळी आडवी झाल्याचे पाहून मोठा धक्का बसला. हताश होऊ डोक्याला हात लावण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही.

अधिकऱ्याकडून पंचनामे
शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे कळताच आडगाव विभागातील कृषी सहायक आर.डी. पाटील, तलाठी आय.एस. महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून दोन्ही शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे केले होते.

योगराज माळी यांची नऊ महिन्याची केळी बाग झाली असून साधारणत: दोन लाख रुपयांचा फटका एका रात्रीतून अर्धा तासाच्या चक्रीवादळात बसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या या शेती पिकाचे नुकसान झाल्यावर कळताच नरवाडे ग्रामस्थांनी एकच गर्दी शेतात केली होती.

शासनाकडून मिळते 8000 रुपये एकरी मदत
लाखो रुपये खर्च करून शेतकरी राब राब राबवून शेतीत हजरो किंमतीचे फवारणी देखील केळी बागांना करत असला तरी नैसर्गिक आपत्ती म्हणून केळीच्या नुकसानीला शासनाकडून अतिशय फाटकी मदत म्हणजे 8000 एकरी ही तालुक्यात दिली गेली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जे.बी.साळुंके यांनी दिव्य मराठीला सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. जमिनदोस्त झालेल्या केळीबाग आणि हताश झालेल्या शेतकर्‍याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...