आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात दम‘धार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहर परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील मेहरूण, आशाबाबानगर, दूध फेडरेशन समोरील झोपडपट्टी, सुपी्रम कॉलनी मागील परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे सालारनगर तसेच मेहरूणमधील सप्तशृंगीनगरातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन वाहून गेली आहे. अक्सानगरमध्ये पावसामुळे झाड कोसळले.

जोरदार पावसामुळे पालिकेच्या यंत्रणेची र्मयादा स्पष्ट झाली आहे. शहरातील कोर्ट चौकाकडून वाहून येणारे पाणी नवीपेठ भागाकडे येत असल्याने सरस्वती डेअरी समोर प्रचंड पाणी साचले होते. या ठिकाणी सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली योजना निष्क्रीय ठरली. नवीन भिकमचंद जैन मार्केट व अप्पा महाराज समाधीसमोरील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून होते. हंबरझर्‍यातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून आल्याने रामेश्वर कॉलनीत रस्त्यांवर पाणी साचून होते. लेंडीनाल्याला पूर आल्याने साईबाबा मंदिरामागील परिसरातील काही घरांमध्ये पाणी साचले होते. सालारनगर व सप्तर्शृंगीनगरात नाल्यावरील 6 इंची पाईप लाईन वाहून गेली. दुपारी 4 वाजेच्या सुमारास अक्सानगरमध्ये शिसमचे झाड पावसामुळे कोसळले होते. बजरंग बोगद्यातून पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने सकाळी 10 ते 11.30 व दुपारी 3 ते 5 या वेळेत वाहतूक ठप्प झाली होती.


पावसातच पाइपलाइनची जोडणी
सालारनगर, सप्तशृंगीनगर, अक्सानगर या भागातील नाल्यावर असलेली पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी वाहून गेली आहे. बुधवारी या भागात पाणीपुरवठा होणार होता. नाल्याचा पूर कमी झाल्यावर या ठिकाणी नवीन पाइप जोडणी केल्यानंतर बुधवारी दुपारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा प्रवाह ओसरल्यावर सर्वच नाल्यांवरील पाइप लाइनचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अ.वा.जाधव यांनी स्पष्ट केले.

मेहरूण तलावाच्या जलसाठय़ात वाढ
मेहरूण तलावाच्या पाणीसाठय़ात सायंकाळपर्यंत चांगली वाढ झाली होती. तलावात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवल्याने नेमका किती जलसाठा झाला आहे, याचे मोजमाप करताना अडचणी येत असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केले.


निम्मे शहरात वीजपुरवठा खंडित
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील सहा फीडर ट्रिप झाल्याने निम्मे शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. शास्त्री टॉवर, विठ्ठलपेठ, जी.एस.ग्राउंड, 11 केव्ही औद्योगिक वसाहत, 33 केव्ही वाघूर या फीडरवरील यंत्रणा ट्रिप झाली होती. सायंकाळपर्यंत वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिक ांनी संताप व्यक्त केला. यासह अनेक ठिकाणी जंपर तुटणे, झाड पडून तार तुटणे आदी घटना घडल्या. फीडरवरील खंडित वीजपुरवठा तत्काळ दुरुस्त केल्याचे क्रॉम्प्टनचे युनिटहेड डॉ.व्ही.पी. सोनवणे यांनी सांगितले.