आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दबंग' पावसाने शहराची दाणादाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव शहरातबुधवारी मध्यरात्री झालेल्या मान्सूनपूर्व 'दबंग' पावसाने जळगावकरांची झाेप उडवली. विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसाने अक्षरश: झाेडपून काढले. यात इच्छादेवी मंदिर, एसटी महामंडळाच्या वर्कशाॅपसह शासकीय अायटीअायची भिंत काेसळली.

फुकटपुऱ्यात जमिनीपासून चार फूट उंच पाणी वाहत असल्याने घरातील संसाराेपयाेगी साहित्य वाहून गेले. त्यामुळे गुरुवारी सकाळी शेकडाे कुटुंबांच्या जेवणाचेही वांदे झाले. तसेच पावसामुळे अर्धे शहर अंधारात हाेते. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम वेळीच झाल्याने तसेच साखरझाेपेत असलेल्या पालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसताेय.

अर्धे शहर अंधारात पक्क्या भिंती काेसळल्या
एसटीमहामंडळालागून असलेली भजे गल्ली कडील संरक्षण भिंत पहाटे २.४५ वाजता काेसळली. यामुळे भजे गल्लीकडील रस्त्यावरील वाहतूक खाेळंबली हाेती. तसेच शासकीय अायटीअायची संरक्षण भिंतही पावसाच्या पाण्याने काेसळली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचला हाेता. त्यामुळे पादचाऱ्यांना मार्ग काढणेही कठीण झाले हाेते. िसव्हिलच्या रस्त्यावर माेठे तळे साचलेले हाेते.
पुरात जलवाहिनी वाहिली
गुरुदेवकाॅलनीकडून सालारनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नाल्याला अालेल्या पुरात वाहून गेली. यात ३५ ते ४० फुटांचा सहा इंची पाइप वाहून गेला. शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांनी दुपारी जलवाहिनीच्या जाेडणीचे काम हाती घेतले हाेते. भिकमचंद जैननगरात लिंबाचे झाड काेसळले तर केळकर हाॅस्पिटलजवळील गुलमाेहराचे झाड वादळामुळे उन्मळून पडले.
महिलेस हार्ट अॅटॅक
ईच्छादेवीमंदिराजवळील शेख अन्सार शेख वाहीद यांच्या घरात पुराचे पाणी शिरताच घाबरलेल्या त्यांच्या पत्नी रुख्सानाबी यांना हृदयविकाराचा झटका अाला. त्यामुळे त्यांना तातडीने सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात अाले. पुस्तकविक्रेते शेख जब्बार यांच्या घरातील अनेक शैक्षणिक पुस्तकेही अाेलेचिंब झालेत. जमिलाबी बागवान यांच्या घराचे छत काेसळले. या वेळी उपमहापाैर सुनील महाजन यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली.
नालेसफाईचा फज्जा
दरवर्षीजानेवारी, फेब्रुवारीत सुरू हाेणारी नालेसफाई यंदा मे महिन्यात सुरू झाली. त्यात जेसीबीच्या अडचणीमुळे थातूरमातूर कामे उरकण्यात अाली. नालेसफाईचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाचे बुधवारच्या दमदार पावसाने पितळ उघडे पाडले. मास्टर काॅलनीतून वाहणाऱ्या नाल्याकाठच्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. मात्र, प्रत्यक्षात नालेसफाईला काेणी अालेच नसल्याचा अाराेप, या भागातील नागरिकांनी केला. या भागात अाणखी अर्धा तास पाऊस झाला असता तर नागरिकांना घरात राहणे कठीण झाले असते.
पहिल्याच दमदार पावसाने बुधवारी खंडित झालेला अर्ध्या शहरातील वीजपुरवठा दुसऱ्या दिवसापर्यंत खंडितच होता. पावसाने उघडीप दिल्यानंतर १० तास उलटूनही खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यात क्रॉम्प्टन अपयशी ठरली आहे. पावसामुळे काही भागात तारा, कंडक्टर तुटून वीजपुरवठा बंद होता. याबाबत नागरिकांनी कॉल सेंटरवर संपर्क साधला. परंतु, त्यांना याेग्य प्रतिसाद िमळाला नाही.

अख्खा पूल वाहून गेला
शहरातजून राेजी अागमन झालेल्या पावसाने दरराेज हजेरी लावायला सुरुवात केली अाहे. बुधवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने पुन्हा मध्यरात्री वाजेच्या सुमारास िवजांच्या कडकडाटासह जाेरदार हजेरी लावली. सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती िर्माण झाली हाेती. वर्षभर गटारात साचून असलेल्या गाळामुळे पाणी वाहून जाण्यास मार्ग मिळाल्याने रस्त्यावरून फूटभर पाणी वाहत हाेते. झाेपडपट्टी दाटवस्तीत मुसळधार पावसाने दाणादाण उडवून िदली. तांबापुराला लागून असलेल्या फुकटपुरा भागात प्रत्येक घरात जमिनीपासून चार फूट उंच पाणी साचल्याने एेन मध्यरात्री लहान मुलांना घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी धाव घ्यावी लागली. गणपतीनगरातून अालेल्या पाण्याच्या लाेंढ्यामुळे इच्छादेवी मंिदराची पूर्वेकडील भिंत काेसळली. त्यामुळे तांबापुरातून येणारे पाणी त्यात भिंत तुटल्याने पाण्याचे प्रमाण वाढून शेकडाे घरांमधील अन्नधान्य, अंथरूण, भांडे अादी साहित्य वाहून गेले. इक्बाल काॅलनीतही यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. शहरातील सखल भागात दुसऱ्या िदवशीही तळे साचलेले हाेते. खंडेरावनगरातील पूल अखेर रात्रीच्या पावसात वाहून गेला. कासमवाडीतही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. शिव काॅलनीतही रेल्वे पुलापर्यंत पाणी हाेते. राेटरी हाॅलजवळही पावसामुळे वृक्ष काेसळला. शहरात मध्यरात्री सर्वच नाल्यांना पूर अाल्याने अनेकांनी रात्र जागून काढली.

िदवसभर दुरुस्ती
बुधवारीरात्री पावसाला सुरुवात होताच रिंग रोड, गणेश कॉलनी, शिवाजीनगर, मू.जे.महाविद्यालय, मेहरूण, एसएमआयटी काॅलेज, बळीरामपेठसह अर्ध्या शहरात अंधार हाेता. शहरातील मध्यवर्ती भागातील आठ ते नऊ फीडर बंद झाल्याने तसेच शिवतीर्थ मैदानासह विविध भागात सहा झाडे तारांवर पडल्याने अन् चार खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने क्राॅम्प्टने सांिगतले. गुरूवारी सकाळी काही भागात वीजपुरवठा सुरळीत झाला. तर दुपारी एसएमआयटी, शिव कॉलनी, जुने जळगाव, मू.जे.महािवद्यालय परिसरात वीजदुरुस्तीचे काम सुरूच होते. रात्री पुन्हा गणेश काॅलनी शिव काॅलनीत वीज पुरवठा बंद हाेता.
नगरसेवकांकडे ठिय्या
रात्रीवाजेच्या सुमारास फुकटपुरात लाेकांना घरात बसायलाही जागा नसताना नागरिकांनी थेट नगरसेवक शेख शबानाबी सादिक यांचे घर गाठले. या वेळी नागरिकांनी त्यांना व्यवस्था करण्याची िवनंती केली. परंतु, मध्यरात्री भर पावसात काय करावे? हा प्रश्न त्यांना पडला. महापालिका एक पैशाचे काम करत नसताना नगरसेवक म्हणून मदत करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त हाेत हाेता.
घरात पाणी घुसल्याने नागरिक संतापले
लढ्ढाफार्म समाेर महामार्गाला लागून असलेल्या घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिक चांगलेच संतापले हाेते. त्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे केला. या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गापेक्षा खाेल जागेत घर असल्याने पावसाचे पाणी घरात गेले हाेते. जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला वाट करून देण्यात अाली.