आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चंद्रपूरमध्‍ये वैनगंगेत बोट उलटली, 10 जणांना वाचवण्‍यात यश, 2 बेपत्‍ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्‍यातील अनेक भागांत आज (मंगळवार) सलग पाचव्‍या दिवशीही पावसाची रीपरीप सुरू आहे. त्‍यामुळे नद्या- नाल्‍यांनी पात्र सोडले असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी, जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.
चंद्रपूरमध्‍ये वैनगंगेत बोट उलटली
चंद्रपूर - जिल्‍ह्यात भाजीपाला विक्रेत्‍यांची नाव उलटून 12 जण बुडाले होते. यापैकी 10 जणांना वाचवण्‍यात यश आले असून, 10 जण अजूनही बेपत्‍ता आहेत. ही दुर्घटना देसाइगंज तालुक्यातील सावंगी गावातील वैनगंगा घाटावर घडली.
नेमके काय झाले ?
जुनी लाडज (ता. ब्रह्मपुरी) येथील काही भाजीविक्रेते आणि विक्रेते नावेने देसाइगंज येथे येत होते. नदी कानाऱ्यापासून 15 ते 20 फूट अंतरावर जाताच ती उलटली. यापैकी 2 पुरुष व 1 मुलगा पोहत बाहेर आला. जिल्‍हा प्रशासनाने 1 महिला आणि मुलाला सुखरुप बाहेर काढले. पण, उर्वरित अद्याप बेपत्‍ता आहेत.
झाडीपट्टीत सलग पाचव्‍या दिवशीही मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, अनेक नद्या - नाल्‍यांना पूर आला आहे. त्‍यामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्‍ह्यातील जवळपास 250 गावांचा संपर्क तुटला आहे.
गोंदियात मुलगा तर वाशीममध्‍ये युवक वाहून गेला
मुसळधार पावसामुळे आलेल्‍या पुरात गोंदिया जिल्‍ह्यात एक 14 वर्षांचा मुलगा तर वाशीम जिल्‍ह्यातील मानोरा तालुक्‍यात एक युवक वाहून गेला.
390 मिमी पावसाने महापूर, 4 वाहून गेले, रेल्वे ट्रॅकही उद‌्ध्वस्त
नंदूरबार - शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या पाचाेराबारी गावात रविवारी एकाच रात्री तब्बल ३९० मिमी पाऊस बरसला. त्यामुळे नदीनाल्यांना पूर येऊन सहा जण वाहून गेले. त्यापैकी चाैघांचे मृतदेह शाेधण्यात यश अाले, तर इतर दाेघे मात्र अजूनही बेपत्ता अाहेत. पुरामुळे रेल्वे ट्रॅकही उखडला, त्यामुळे सुरत-नंदुरबार पॅसेंजर रेल्वे रुळावरून घसरली. सुदैवाने या दुर्घटनेत काेणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरत-भुसावळ मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली हाेती. अतिवृष्टी व पुरामुळे १७३ जनावरे ठार झाली, तर १७१ घरांचे नुकसान झाले आहे.

नाल्याला पूर आल्याने रेल्वे ट्रॅक फाेडून पाणी पाचोराबारी गावात िशरले. यात अनेक घरे जमीनदाेस्त झाली. एका घरातील इंदुबाई प्रकाश वसावे (२०), प्रल्हाद प्रकाश वसावे (६), उखडीबाई भाईदास वसावे (५२) तसेच गणेश मलू पवार (११) हे चार जण वाहून गेले. त्यांचे मृतदेह सकाळी सापडले. तर राधाबाई मलू पवार व रितू मलू पवार हे बेपत्ता असून त्यांचा शाेध सुरु अाहे. मध्यरात्री १२.३० पासूनच परिसरात प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले हाेते. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही आपत्ती निवारणाच्या सूचना दिल्या.
रेल्वेचे युद्धपातळीवर काम
रेल्वे ट्रॅक दुरुस्तीसाठी १५० कर्मचारी तैनात असून अाणखी शंभर कर्मचारी बोलावण्यात आले आहेत. किमान ४८ तास दुरुस्तीस लागणार अाहेत. रेल्वेच्या १७४ क्रमांकाच्या पुलाचे नुकसान झाले असून ४०० मीटर ट्रॅकचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.

रेल्वेमुळे वाचले गाव
> रात्री नाल्याला पूर आला. तेव्हाच पॅसेंजर आली. पुराचे पाणी पॅसेंजरमुळे अडवले गेले. अन्यथा गावच वाहून गेले असते. रेल्वेत १२५ च्या आसपास प्रवासी होते. सर्वजण सुदैवाने बचावले. त्यांना खासगी वाहनाने त्यांच्या गावी रवाना करण्यात अाले, अशी माहिती स्थानिक रहिवासी विलास संभू पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

> या गावात दोन नाले वाहतात. हे दोन्ही नाले एकत्र येऊन रेल्वेच्या पलीकडे तलाव साचला. साचलेले पाणी रेल्वे ट्रॅक फोडून गावात शिरल्याने माेठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचेही सांगण्यात अाले. पुरामुळे विजय यशवंत मराठे यांच्या पाच एकर मळ्यातील केळीचे पीक वाहून गेले. ठिबक सिंचनचे नुकसान झाले. पोलही पडले.

> राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पूरग्रस्तांसाठी तत्काळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली. लाेकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. आरोग्य विभागातर्फे घरोघरी औषधी पुरवण्यात अाली. तसेच इतर मदतही करण्यास अनेक जण सरसावले हाेते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राज्‍यातील इतर ठिकाणीही कशी होती परिस्‍थिती..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...