आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतविृष्टी, रावेर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ/जळगाव - गेल्या महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस जळगाव जिल्ह्यात आता स्थिरावला आहे. सलग दुसऱ्या दविशी संततधार सुरू होती. पाच तालुक्यांत अतविृष्टीची नोंद झाली. तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे ४१ दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग केला जात होता. हतनूर धरणातून १३ हजार ८२८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मंगळवारी रावेर तालुक्यात अतविृष्टी झाली. येथे १२८.५८ मिमी म्हणजे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच यावल, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांतही अतविृष्टी झाली.

सतर्कतेचा इशारा :यावल तालुक्यातील नदीकाठांवरील गावांना तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

आकडे मिमीमध्ये
यावल- ६७.५ भुसावळ- ९६.९५ मुक्ताईनगर- ८०.७५
बोदवड- ११५.३३ जळगाव- ५७.३५ जामनेर- ५४.३७
एरंडोल- ५१.२५ धरणगाव- ४७.३० पाचोरा- ४७.४२
चाळीसगाव- ३६ भडगाव- ४२.२५ अमळनेर- ३९.१२
पारोळा- ४०.६० चोपडा- ५६.८५

एेनपूरची वृद्धा पुरात बुडाली
ऐनपूरयेथील श्यामाबाई राजाराम महाजन (वय ७०) या वृद्ध महिलेचा बुधवारी तापी नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रावेर तालुक्यातील अजनाड, विटवे, निंबोल, ऐनपूर या गावांचे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे, तर पंचाणे शाळेचे छत कोसळले आहे. तापीसह सुकी, मोर या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
बातम्या आणखी आहेत...