आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिल हीटने जळगावकर हैराण, पारा पोहोचणार ४४ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बेमोसमी पावसामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळालेल्या जळगावकरांना एप्रिलचा दुसरा आठवडा मात्र, घाम फोडणारा ठरत आहे. येत्या नऊ दिवसांत तापमानाचा पारा ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी शनिवारी वातावरण ढगाळ राहील. परंतु, त्यामुळे उकाड्यात वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

मंगळवारी जळगावात ४०.५ तापमानाची नोंद करण्यात आली. प्रत्यक्षात एका खासगी हवामान केंद्रावर तापमान ४२ अंश होते. तसेच सकाळी जळगाव जिल्ह्यात काही वेळ ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा वाढला होता. येत्या नऊ दिवसात तापमान मात्र ४४ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

दिवसभरात असे वाढले तापमान

सकाळी 9 वाजताच शहरात ३५ अंश तापमानाने सुरुवात झाली. ११ वाजेला पारा ४० अंशांवर पोहोचला. या वेळी आर्द्रता १४ टक्के होती. तर वाऱ्याचा वेग ताशी ते १० प्रतिकिलोमीटर असल्याने उन्हाच्या झळांनी जळगावकर प्रभावित झाले. दुपारी १२ ते वाजेदरम्यान पारा ४२ अंशांवर पोहोचला होता. दुपारचे तीन तास सर्वाधिक हॉट ठरले. वाजेला ४१ अंश तर वाजता ४० अंशांवर आलेला पारा नंतर खाली आला. परंतु, वाऱ्यामुळे उन्हाळाच्या झळांनी उशिरापर्यंत जनजीवन प्रभावित झाले होते. रात्रीदेखील तापमान तब्बल २८ अंशांपर्यंत कायम होते.

मंगळवारचे तापमान

जळगाव४०.५ अंश सेल्सिअस, नाशिक ४०.६, औरंगाबाद ४०.४, नांदेड ४१, बुलडाणा ३९.२, चंद्रपूर ४३.४, नागपूर ४२.२, महाबळेश्वर ३१.७, पुणे ३९.९ अंश सेल्सिअस.