आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heena Gavit News In Marathi, BJP, Nandurbar Lok Sabha Constituncy, Divya Marathi

डॉ. हीनाच्या उमेदवारीवर बुधवारी होणार निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येथील भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावित यांच्या उमेदवारीवर कॉँग्रेस व ‘आप’तर्फे आक्षेप घेण्यात आला असून, याबाबत गावित यांच्या वकिलांनी मागितलेल्या मुदतीमुळे त्यावरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या छाननीत खान्देशातील चार मतदारसंघांतून 16 उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
डॉ.हीना गावित या जे.जे.हॉस्पिटलमध्ये एमडी करीत आहेत. त्या मोबदल्यात त्यांना 40 हजार रुपयांचे पाठय़वेतन मिळते. त्यांच्या उमेदवारीला कॉँग्रेस व आपने हरकत घेतली आहे. दरम्यान, याबाबत डॉ.हीना गावित यांच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. तसेच या प्रकरणावर 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत निर्णय देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आठ अर्ज बाद : जळगावमध्ये एक व रावेरमध्ये सात जणांचे अर्ज बाद ठरले. जळगाव मतदारसंघात 21 व रावेरमध्ये 34 असे एकूण 55 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीसाठी बुधवारी शेवटची मुदत असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. जळगावमध्ये स्मिता वाघ यांचा एकमेव अर्ज बाद ठरला. तसेच रावेरमध्ये गिरीश महाजन, नीतिका जैन, शेख रमजान, प्रवीण सपकाळे, अहमद तडवी, राजेंद्र पाटील व राजेश पोतदार यांचे अर्ज बाद ठरले. नंदुरबारमध्ये चार अर्ज बाद : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून 4 अर्ज बाद ठरले आहेत. तसेच दोन उमेदवारांनी दाखल केलेल्या 8 नामांकन अर्जांवरील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. सध्या 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
धुळ्यात चार अर्ज बाद : धुळे लोकसभा मतदारसंघातून चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. त्यात भाजपच्या डमी उमेदवार बीना भामरे, अपक्ष उमेदवार नरेश बापू गवळे, शैलेंद्र कौतिक खोंडे (शिरपूर) व शिवाजी त्र्यंबक अहिरे (मालेगाव) यांचा समावेश आहे.
बाद झालेले अर्ज
जळगाव : 1
रावेर : 7
धुळे : 4
नंदुरबार : 4