आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारपीटग्रस्तांना 2 कोटी 18 लाखांचे झाले वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 2107.72 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक -यांना शासनाकडून अनुदान वितरण सुरू आहे. आतापर्यंत प्राप्त 3 कोटी 59 लाखांपैकी 2 कोटी 18 लाखांचे वाटप झाले.

शासनाच्या निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने तालुक्यातील 2107.72 हेक्टरवरील गहू, केळी आणि इतर पिंकाच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक -यांना अनुदानाची घोषणा केली. पंचनाम्यानुसार तालुक्यातील 6 हजार 250 शेतकरी पात्र ठरल्याने शासनाकडून 3 कोटी 59 लाख रुपये अनुदान महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले. ही रक्कम महसूल विभागाने 1 एप्रिलपासून नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 2 कोटी 18 लाख 85 हजार 374 रुपये 4 हजार 117 शेतक -यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत. ही रक्कम शेतक -यांना पेरणीच्यावेळी उपयोगी येईल.
गव्हासह केळीबागांचे झाले होते नुकसान
7 जुलैपर्यंत वाटप
अनुदान वाटपाचे बँकनिहाय धनादेश बाधित शेतक -यांना लवकरात लवकर वितरित करण्यासाठी गावनिहाय तलाठी, मंडळाधिकारी आणि कृषी सहायकांची समिती तयार करण्यात आली आहे. समितीला 7 जुलैपर्यंत धनादेश वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिंदी परिसर वंचित
- अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर शिंदी परिसरात पिकांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अनुदान यादीत बाधित शेतक -यांची नावे नाहीत. नवलसिंग राजपूत, सरपंच, शिंदी
पालकमंत्र्यानी घेतला आढावा
भुसावळ तालुक्यातील अनुदान वाटपाचा कृषी राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे आणि तहसीलदारांकडून आढावा घेतला. उर्वरित रक्कम शेतक -यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश दिले.
अनुदान वाटपाला प्राधान्य
- शासनाच्या निर्देशानुसार उर्वरित शेतक -यांना लवकरच अनुदानाची रक्कम वितरित होईल. गावनिहाय 7 जुलैपर्यंत प्राप्त अनुदानाचे वाटप करू. अनुदानाच्या रकमेसंदर्भात जर काही तांत्रिक अडचणी येत असतील तर नुकसानग्रस्त शेतक -यांनी थेट अधिका -यांशी संपर्क साधावा.
बी.एन.भिडे, प्रभारी नायब तहसीलदार, भुसावळ