आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानकावर वाढवली गस्त!, रेल्वे मंत्रालयाने केला ‘हाय अलर्ट’ जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पंजाबमध्येझालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे खबरदारीचे सर्व उपाय योजले जात आहेत. देशभरातील स्थानकांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे मंत्रालयातर्फे ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. भुसावळ विभागालाही तशा सूचना मिळाल्याने रेल्वेस्थानकांवरही साेमवारी सकाळपासूनच श्वानपथकाद्वारे तपासणी सुरू करण्यात आली. भुसावळ विभागातील विविध रेल्वेस्थानकांवर गस्त वाढवली असून, प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
संशयितांच्याहालचालींवर लक्ष
साेमवारीसकाळी अारपीएफचे पाेलिस निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.एस.हरणे, सहायक फाैजदार समाधान वाहुलकर अनिल पवार यांनी सहकाऱ्यांसह अप डाऊन मार्गावरील रेल्वेगाड्यांची तपासणी केली. रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या बॅगा, इतर साहित्य, प्रतीक्षालयातील बाथरूम, मुसाफिरखाना, लगेज विभागाचा परिसर या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वेस्थानकाच्या दाेन्ही बाजूला असलेल्या लगेज स्कॅनरद्वारे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तसेच रेल्वेस्थानकावर लाेहमार्ग पाेलिसांची गस्तही वाढवण्यात आली अाहे. संशयित व्यक्तींवर पाेलिसांचे लक्ष असल्याचे जीअारपीचे निरीक्षक अानंद महाजन यांनी सांगितले.

अाधुनिक उपकरणांचा वापर
रेल्वेस्थानकावरीलसुरक्षेला प्राधान्य देत आरपीएफतर्फे अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात अाहे. व्हेइकल मिररद्वारा पार्किंगमधील वाहनांची तपासणी केली जात अाहे. लगेज स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जात अाहे. तसेच अारपीएफच्या श्नानपथकातील ‘सूर्या’ श्वानाद्वारे स्थानकावर प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू आहे. आगामी १५ दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ येथील निरीक्षक विनाेदकुमार लांजीवार यांनी दिली.

गस्त अधिक कडक
अारपीएफसाेबतचजीअारपी (लाेहमार्ग पाेलिस) पाेलिसांकडून रेल्वेस्थानकावर संशयितांवर लक्ष ठेवले जात अाहे. साध्या वेशातील पाेलिसांची गस्त भुसावळ आणि जळगाव या रेल्वेस्थानकांवर वाढवण्यात आली आहे. तसेच भुसावळात अारपीएफ जीअारपीची संयुक्त गस्त स्थानकापासून दगडी पुलापर्यंत सुरू आहे.

आरपीएफला सहकार्य
भुसावळविभागातून धावणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये तपासणीची मोहीम राबवली जात अाहे. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरपीएफतर्फे अधिक सतर्कता बाळगली जात आहे. या कामात आरपीएफला पाेलिसांचेही सहकार्य लाभत आहे. बंदोबस्तासाठी भुसावळ विभागात प्रशिक्षणार्थी आरपीएफ जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. भुसावळ जंक्शनसह विभागातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर बंदाेबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानकावर कुठेही पडलेल्या बेवारस वस्तूला हात लावू नये, असे अावाहनही रेल्वे प्रशासनाने केले अाहे.

भुसावळ जंक्शन स्थानकावर प्रवाशांकडील सामानाची तपासणी करताना अारपीएफचे पथक.
शेगाव, नाशिकला खबरदारी : भुसावळविभागातील शेगाव कुंभच्या पार्श्वभूमीवर नाशिकराेड रेल्वेस्थानकावरही बंदाेबस्त वाढवण्यात अाला अाहे. शेगावला भाविकांची दरराेज हाेणारी गर्दी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- भुसावळ विभागातील जळगाव, बऱ्हाणपूर, खंडवा, अकाेला, शेगाव, बडनेरा, मनमाड, नाशिकराेड या रेल्वेस्थानकांवर श्वानपथकाद्वारे तपासणी केली जात अाहे. तसेच गस्तही कडक करण्यात आली आहे. चंद्रमाेहनमिश्र, मंडळ अायुक्त, रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई भुसावळरेल्वेस्थानकावर आरपीएफचे निरीक्षक लांजीवार यांनी सोमवारी १० अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली. परवाना नसताना स्थानकावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना आरपीएफने ताब्यात घेतले. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. दाेन्ही प्रवेशद्वारांबाहेर ‘नाे-पार्किंग झाेन’मध्ये वाहने उभी करणाऱ्यांवरही कारवाई केली जात अाहे. महिलांच्या बाेगीत घुसखाेरी करून दांडगाई करणारेही रेल्वे सुरक्षा बलाच्या रडारवर असून, गत अाठवड्यापासून माेहीम उघडण्यात अाली अाहे.