आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला लूक: हाय हिल्स सँडल्सचा वापर आरोग्यासाठी घातक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चित्रपट आणि मालिकेप्रमाणेच महिला ड्रेसिंगनुसार चप्पल, बूट आणि सँडल घालणे पसंत करतात. सध्या बॅलेट पंप्स आणि फ्लॅट हिल्सची फॅशन आहे. हाय हिल्स घालण्याबरोबर इतर चपलांचेही शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. हाय हिल्स वापरल्याने पाठीच्या कण्याचे आजार, टाचदुखी, पंजादुखी किंवा पायांच्या मुख्य वाहिन्यांवर ताण पडतो. त्यामुळे तळव्यांनाही आधार मिळेल अशा प्रकारची पादत्राणे वापरावीत, असा सल्ला ऑर्थाेपेडिशयनी दिला आहे.

गर्भवती स्त्रियांना साधारणत: सपाट चपला वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे नेमकी पादत्राणे न वापरल्याने आरोग्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढतात. त्यामुळे जीमला जाणार्‍या महिला, तरुणींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हाय हिल्सच्या वापराने पायाच्या पंजावर विशेषत: अंगठय़ावर प्रचंड ताण येतो. त्यामुळे अंगठय़ाला जखमा होण्याची शक्यता वाढते. याशिवाय पाठीच्या कण्याचा आजार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

चुकीची पादत्राणे घालू नका
मानवी शरीरात असलेल्या एकूण हाडांच्या 70 टक्के हाडे पायांमध्ये आहेत. ही हाडे शरीराचे संतुलन ठेवणे आणि गतिशीलता साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यामुळे चुकीची पादत्राणे घालून आरोग्याची हानी टाळण्यावर महिलांनी अधिक भर द्यावा.

मोठय़ा- लहान बुटांमुळे अंतर्गत जखमा
अनेकदा पालक मुलांचे वाढते वय लक्षात घेता मोठे बूट घेऊन देतात. महिला फॅशनच्या नावाखाली पायापेक्षा लहान शूज वापरतात. मात्र, यामुळे पायांना अंतर्गत जखमा होत असतात. यातून अंगठय़ाच्या हाडाला किंवा नखाला दुखापत होते.

बॉलीवूड फॅशनचा मोठा प्रभाव
चित्रपटांत येणार्‍या कपड्यांना शोभतील अशा चपला, बूट घालतात. तीच फॅशन आपल्याकडे येते. सध्या बॅले शूज फॅशनमध्ये आहेत. क म्फर्ट लूक देणारे आहेत. स्वेट लेदर, लेदर, कॅन्व्हास अशा विविध प्रकारांत हे उपलब्ध आहेत.
-दीपक ललवाणी

संपूर्ण पायाला आधार मिळणे अपेक्षित आहे
हाय हिल्स वापरल्याने टाचदुखी, पंजादुखी किंवा पायाच्या मुख्य वाहिन्यांवर ताण पडतो. सपाट चपला किंवा बूट वापरल्यास धोका नाही, हा समज चुकीचा आहे. सपाट चप्पल, बूट वापरताना पंजा आणि टाचेप्रमाणेच पायाच्या मधल्या भागाला आधार मिळणेही गरजेचेच आहे. पायाचा मधला भाग खेलगट असतो. त्या भागालाही आधार मिळणे आवश्यक असते. ज्यांना खूप वेळ चालावे किंवा उभे राहावे लागते, त्यांनी अशा पद्धतीचे जोडे वापरणे टाळावे.
-डॉ. किशोर पाटील