आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरनियंत्रण रेषा; वर्ष उलटूनही निश्चित नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतविृष्टीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरकिांचे प्रचंड नुकसान झाले होते. पुन्हा ही स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाडून सातत्याने पूर नियंत्रण रेषा (हाय अॅन्ड लो फ्लड लाइन) निश्चितीसाठी पत्रव्यवहार होतो. परंतु केवळ जबाबदारी कोणाची यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. गिरणा पाटबंधारे विभागाला पत्र देऊन महिना उलटला. मात्र, त्यावर साधे उत्तरही आलेले नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबरला प्रचंड पाऊस झाला होता. शहरात सर्वत्र पाणीच पाणी होते. सर्वच नाले आेसंडून वाहत होते. घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेक संसार उघड्यावर पडले होते. मागच्याला ठेच पुढचा शहाणा या म्हणीप्रमाणे जिल्हाधकिारी रुबल अग्रवाल यांनी शहरातील नाल्यांची पूर नियंत्रण रेषा निश्चित करून घेण्याच्या सूचना महापालकिेला दिल्या होत्या. त्यानुसार महापालकिेने २० मे २०१५ रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले होते. यात शहरातील आठ नाल्यांची पूरनियंत्रण रेषा ठरवून देण्याची मागणी केली होती. परंतु गिरणा नदी ही गिरणा पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्यांच्याकडून हे काम करून घ्यावे, असा सल्ला दिला होता. त्यानंतर पालकिेने जुलै २०१५ रोजी गिरणा पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे. मात्र, आता २२ दिवस उलटूनही कोणतेही उत्तर पालकिेला प्राप्त झालेले नाही.

हे आहेत प्रमुख नाले
>समतानगर ते हरिविठ्ठलनगर रेल्वे बोगद्यापर्यंत (४.६ किमी).
> गंधर्व काॅलनीपासून ते बजरंग पुलापर्यंतचा नाला (१.०७ किमी).
> रेमंड काॅलनीपासून खेडी गावास लागून उत्तरेस मनपा हद्दीपर्यंतचा नाला (५.०७ किमी).
> रामदास काॅलनी ओपन स्पेस पासून उत्तरेस आयटीआयजवळून बाॅम्बे रेल्वे लाइनपर्यंतचा नाला (२.८० किमी).
> टागोरनगर ते चंद्रप्रभा काॅलनीपर्यंतचा नाला (१.५० किमी).
> खंडेरावनगर रेल्वे बोगद्यापासून पिंप्राळा गावास लागून गिरणा नदीपर्यंत जाणारा नाला (३.७ किमी).
> बजरंगपूल बोगदा ते एसएमआयटी काॅलेज ते जुना हायवे ते सुरत रेल्वे लाइन (१.५५ किमी).
- अंबडझरा तलावापासून ते नॅशनल हायवेपर्यंत (२ किमी).

अनिष्ट प्रसंगाला कोण जबाबदार
राज्यपाटबंधारे विभागाचे सप्टेंबर १९८९ चे परिपत्रक आहे. यात शहर गावात पूर रेषा आखून देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून केवळ पत्रापत्रीचा खेळ सुरू आहे. पुन्हा मुसळधार पाऊस झाला आणि शहरात पूरस्थिती निर्माण झाली तर त्याला कोण जबाबदार राहील? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पूरनियंत्रण रेषा निश्चित झाल्याशविाय मनपा नगररचना विभागाकडून पुढची कार्यवाही करणे शक्य नसल्याचे सांगितले जाते.