आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चभ्रू सोसायट्यांना चोरटे करताहेत "टार्गेट'; २० दिवसांत चार घरफोड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आदर्शनगर, गणपतीनगर, मोहननगर या सारख्या हायक्लास सोसायट्यांना सध्या चोरट्यांनी टार्गेट केले आहे. आदर्शनगरातील उत्कर्ष काॅलनीमधील सरस्वती डेअरीचे संचालक मुकेश टेकवानी यांच्या बंद घराचे कुलूप ताेडून चोरी केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या २० दिवसांत शहरातील विविध भागात १२ माेठे गुन्हे घडले असून त्यात ४ घरफोड्यांचा समावेश आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे पोलिसांचा धाक संपला की काय? असा प्रश्न जळगावकरांच्या मनात उपस्थित होत आहे.

आदर्शनगरातील उत्कर्ष काॅलनीमधील सरस्वती डेअरीचे संचालक मुकेश टेकवानी यांचे वडील वारल्याने गेल्या ११ महिन्यांपासून त्यांचे घर बंद आहे. ते त्यांच्या आई सोबत आदर्शनगरमधील आयडीबीआय बंॅकेच्या शेजारी राहतात. त्यांच्या आई ताराबाई तुलसीदास टेकवानी या अधून मधून या कंपाउंडमधील झाडांना पाणी घालण्यासाठी येत होत्या. मंगळवारी माेटार दुरुस्त करण्यासाठी टेकवानी आणि त्यांच्या आई येऊन गेले होते. त्यानंतर गुरुवारी ताराबाई सकाळी ९ वाजेच्या सुमारास झाडांना पाणी देण्यासाठी गेल्या असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लागलीच मुलाला फोन करून बोलावले. चोरट्यांनी घरातील १५ हजार रुपये राेख आिण २० चांदीचे १५ ते २० हजार रुपये किमतीचे नाणे चोरीस गेल्याचे लक्षात आले.

अशी केली चोरट्यांनी चोरी : चोरट्यांनी गेटवरून उडी मारून खिडकीचे ग्रील ताेडून १ बाय १.५ फुटाच्या जागेतून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मागच्या दरवाजाचे कुलूप ताेडले. बेडरूमचे लंॅच ताेडून आत प्रवेश करून क पाटांचे दरवाजे टॅमीने उघडून वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. दुसर्‍या बेडरुममधील कपाट उघडून सामान इतरत्र फेकले.
रामानंद पोलिसांचा ‘इगाे’ दुखावला
घरफोडी झालेले घर रामानंद पाेलिस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, घटनास्थळावर स्थािनक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक पाेहोचले. त्यांनी दाेन दिवस अगाेदर प्लंबिंगचे काम केलेल्या कारागिराला चाैकशीसाठी उचलल्याने रामानंद पोलिसांचा आत्मसन्मान दुखावला. त्यामुळे या चोरीचा तपास करण्यासाठी ते चांगलेच कामाला लागले आहे.
काय चोरी झाले ते सांगणे कठीण
या घरात आई, वडील राहत होते. वडील वारल्यानंतर आई माझ्याजवळ राहत होती. तीन दिवसांपूर्वी मी येऊन गेलाे तेव्हा चोरी झालेली नव्हती. काय चोरी झाले आहे. ते आता सांगणे कठीण आहे.
महेश टेकवानी, संचालक, सरस्वती डेअरी
ऑगस्टमध्ये येथे झाल्या घरफोड्या
१ आॅगस्टला डाॅ. याेगेश गुर्जर याच्या घरात ३ लाख १२ हजार ४०० रुपये किमती एेवज लांबविला, ८ राेजी साईबाबांच्या मंदिराची दानपेटी फोडून ३० हजार रुपये लंपास केले. १६ राेजी अिभराम अपार्टमेंटमधील सुधाकर टाेके यांच्या घरा चोरी झाली आहे.
गाैरीने दाखवला डी-मार्टपर्यंत चोरट्यांचा मार्ग
घटनास्थळी पोलिसांच्या डाॅग स्काॅडमधील गाैरीने डी-मार्टच्या समाेरील घरांपर्यंत माग दाखवला. त्यानंतर ती परत आली. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका इसमाने कुत्र्याच्या प्रशिक्षकांना बघून म्हटले ‘कुत्ता बराबर जगह पे आया.’ मात्र, त्यानंतर ताे त्या ठिकाणाहून माेटारसायकलवर बसून िनघून गेला. ताे इसम काेण होता. हे तपासण्याची तसदीही पोलिसांनी घेतली नाही.