आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांना एकाच दिवशी हिवाळा उन्हाळ्याची अनुभूती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हिवाळा संपत असताना मंगळवारी पहाटे जळगावात राज्यातील सर्वाधिक कमी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दिवसा हिवाळ्यातील सर्वाधिक ३५ अंश तापमानाची नोंद झाल्याने हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूची अनुभूती देणारा ठरला.
दुपारी १२ वाजेनंतर उकाड्यात वाढ झाली आणि तापमान झपाट्याने वाढले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या शनिवारपर्यंत पारा ४० अंशांपर्यंत मजल मारणार आहे.
जळगावात मंगळवारपासून उन्हाळ्याची चाहूल लागली.
रात्री १२.४ अंश एवढे कमी तापमान असताना दिवसा मात्र पारा ३५ अंशांवर गेला. तापमानात हळूहळू वाढ होत आहे. येत्या शनिवारपर्यंत रात्रीचे तापमान १९ अंशांपर्यंत तर दिवसाचे ४० अंशांपर्यंत जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत जळगावकरांना खान्देशी उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.