आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साइडपट्ट्या भरताना गुणवत्ता साइडलाच, बांधकाम विभागाकडून अपूर्ण निधीचे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साइडपट्ट्या भरण्यासाठी घाईत काम उरकण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे. अर्धवट टाकलेल्या मुरुमामुळे साइडपट्ट्यांचा मूळ प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले असता सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र निधीच्या टंचाईचे कारण पुढे केले आहे.

अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या साइडपट्ट्या भरण्यासाठी नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साइडपट्ट्या बुजण्याचे काम सुरू झाले आहे. महामार्गावर रस्ता क्रॉसिंग असलेल्या गणपतीनगर, तांबापुरा, आयटीआय, आयएमआर, शिव कॉलनीसारख्या ठिकाणी उतारावर मुरूम टाकताना काळजी घेतली गेली आहे. त्या ठिकाणी मुरूम वाहून जाण्याची शक्यता आहे. उतारावर जास्तीचा मुरूम टाकून दबाई करण्याची आवश्यकता आहे.

मुरुमाच्या रेघोट्या
काहीठिकाणी तर खड्ड्यांमध्ये टाकलेल्या मुरुमाचे प्रमाण अत्यल्प आहे. तो मुरूम खाली बसल्यानंतर तेथे पुन्हा खड्डा पडण्याची शक्यता आहे. रस्त्याला समांतर केवळ एक ते दीड फूट मुरूम टाकला आहे. त्यामुळे रस्त्यावरील उतार कायम राहिला आहे. जिल्‍हा उद्योग केंद्र, मुलींच्या आयटीआयसमोरील रस्ता क्रॉसिंगवरील धोका साइडपट्टी भरल्यानंतरदेखील कायम आहे. साइडपट्टी भरताना तो पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी आणि रोलर फिरवून साइडपट्टी भरणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करणार
-अनेकदिवसांनंतर साइडपट्टी भरली जात आहे. मात्र, केवळ मुरूम टाकण्याचे काम होत आहे. चांगल्या प्रकारचा मुरूम त्याची दबाई करण्याची गरज आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करणार आहे. नितीननन्नवरे, नगरसेवक,शिव कॉलनी
राष्ट्रीय महामार्गावरील साइडपट्ट्यांवर टाकलेला मुरूम.

निधीच नाही
-साइडपट्टीच्या कामासाठी निधीच नाही; जेवढा निधी मिळाला, त्यातच काम उरकायचे आहे. जेथे आवश्यकता आहे, तेथेच मुरूम टाकला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून केवळ १० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यात हे काम करणे शक्य नाही. हेमंतपगारे, अधीक्षकअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
प्रत्यक्षलक्ष देणार