आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपविभागातून 50 किलोमीटर अंतराच्या या मार्गासाठी 23 गावांतील शेतक-यांची 129 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच चौपदीकरणाच्या कामाला सुरूवात होण्याचे संकेत आहेत.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून धुळ््यापासून सुरू होणा-या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. भुसावळ उपविभागातून 50 किलोमीटरचा मार्ग जाणार असल्यामुळे किती शेतक-यांची जमीन यात जाईल, याची माहिती काढण्यात आली आहे. चौपदरीकरणाचे काम धुळ््यापर्यंत पूर्ण झाले आहे. त्यापुढे ते जळगाव जिल्ह््यात सुरू होणार असून त्यादृष्टीने महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. भुसावळ विभागातून 50 किलोमीटर अंतराचा हा रस्ता देशात अमरावती, गुजरात, महाराष्ट्र या नावाने ओळखला जाईल. वाहतूक दळणवळणाच्या सोयी प्रभावीपणे राबविण्यासाठी चौपदीकरण गरजेचे असले तरी यामुळे भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली आणि खडका चौफुलीवर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. दरम्यान येथे उड्डानपूल असावा काय ? याबाबतीतही विचार करण्यात आला असून यासाठीचे सर्व अधिकार राष्ट्रीय महामार्ग विभाग औरंगाबाद या कार्यालयाकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. या मार्गासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील 8 गावे तर भुसावळ तालुक्यातील 15 अशा एकूण 23 गावातील शेतक-यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील 44 तर भुसावळ तालुक्यातील 84 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यानुसार महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
अशी आहेत संपादित गावे - काहुरखेडा, बोहर्डी खुर्द. , बोहर्डी बुद्रूक, तळवेल, जाडगाव, पिंप्रीसेकम, निंभोरा बुद्रूक, फेकरी, कंडारी, भुसावळ, साकेगाव, वरणगाव, फुलगाव, खडके, साकरी (सर्व ता. भुसावळ) आणि चिखली, घोडसगाव, पिंप्री अकराऊत, मुक्ताईनगर, सालबर्डी, सातोड, कोथळी, हरताळे (सर्व ता. मुक्ताईनगर)
तलाठ्यांची झाली बैठक - येथील प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील तलाठ्यांची बैठक नुकतीच झाली. या शिवारातून रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे, त्याची माहिती या वेळी देण्यात आली. शेतक-यांचे सातबारा उतारे महसूल विभागाने या कामासाठी जमा केले आहेत.