आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगाेणेकरसह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - नाशिकचे शिक्षण उपसंचालक बी.एस.सूर्यवंशी, जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगाेणेकर यांच्यासह सहा जणांवर बनावट दस्तएेवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या अादेशानुसार हा गुन्हा दाखल झाला अाहे.
सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमानुसार कोणत्याही संस्थेच्या सभासदास पदाधिकारी होण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी लागते. मात्र, माजी प्राचार्य ए.एन.माळी, उदय नंदकिशोर पाटील, प्रा.धीरज रतीलाल वैष्णव गुलाब आसाराम पाटील यांचा संस्थेशी संबंध नसताना त्यांनी २२ ऑगस्ट २०१४ रोजी सभा बोलावून खोटा अजेंडा काढून विश्वस्तांची संस्थेची फसवणूक केली. माळी यांनी स्वतःला संस्थेचे अध्यक्ष भासवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे प्रथम मान्यता मंडळ संकेतांक क्रमांक मिळवण्यासाठी बनावट प्रस्ताव सादर केला. तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना हे प्रकरण माहीत असतानादेखील खोटी बनावट शिफारस करून त्यांनी शासनाची फसवणूक केली अाहे. नाशिकचे उपसंचालक सूर्यवंशी यांनीही खोट्या प्रस्तावास सहमती दर्शवून संस्थेच्या विकासास बाधा आणली, अशी तक्रार महात्मा फुले शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर ताराचंद जगदेव यांनी न्यायालयात दिली हाेती.या संस्थेचे टाकरखेड्यात माध्यमिक विद्यालय अाहे. न्यायालयाने कागदपत्रे तपासून बी.एस.सूर्यवंशी, शशिकांत हिंगाेणेकर, माजी प्राचार्य ए.एन.माळी, उदय नंदकिशोर पाटील, प्रा.धीरज रतीलाल वैष्णव गुलाब आसाराम पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे अादेश दिले. त्यानुसार अमळनेर पाेलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अाहे.