आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरक भस्म देणारे दोन्ही अटकेत, पैशांच्या पावसाचेे अामिष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पैशांचा पाऊस पाडून देण्याचा बहाणा करून पुण्याच्या चार जणांकडून २५ लाख रुपये लुबाडणाऱ्या भोंदूबाबासह तिघांना बुलडाणा पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यापैकी हीरक भस्म अाणून देण्याचे नाटक करून पैसे घेऊन जाणाऱ्यासह एकाला एमअायडीसी पाेलिसांनी शनिवारी अटक केली हाेती. त्यांना प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता १२ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

रेमंड चौफुलीजवळ १९ डिसेंबर २०१५ रोजी पुणे येथील सुभाष बाबाराव क्षीरसागर (वय २८) यांच्यासह प्रकाश शिंदे, भीमा काेरे, श्रीकांत मनसुख यांची फसवणूक केल्याची घटना घडली हाेती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला अाहे.

बुलडाणा जिल्ह्यात तिघे अटक
यागुन्ह्यातील मुख्य संशयित शेख शफी शेख शब्बीर (वय ३०, रा. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) याला सिंदखेडराजा पाेलिसांनी ३० जूनला अटक केली हाेती. ताे सध्या पाेलिस काेठडीत अाहे. तर शेख जब्बार जैनुद्दीन (वय ३०, रा. शेंदुर्जन, ता. सिंदखेडराजा) अाणि सय्यद साेहेल सय्यद नजीर (वय १९, रा. सिल्लाेड, जि. अाैरंगाबाद) यांना साखरखेर्डा पाेलिसांनी अटक केली हाेती. हे दाेघे बुलडाणा जिल्हा कारागृहात हाेते. एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी सहायक पाेलिस निरीक्षक अार.टी.धारबळे यांच्यासह पथकाला पाठवले हाेते. त्यांनी शनिवारी त्यांना बुलडाणा येथून जब्बार शेख, साेहेल सय्यद यांना दुपारी १.३० वाजता अटक केली. त्यांना शनिवारी न्यायदंडाधिकारी एस.बी.देवरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी १२ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. हेमंत मेंडकी यांनी तर संशयितांतर्फे अॅड. सचिन पाटील यांनी काम पाहिले.

हीरक भस्म देऊन पैसे नेणारा अटकेत
सुभाषक्षीरसागर यांना १९ डिसेंबर २०१५ला रेमंड चाैफुलीवर हीरक भस्म देऊन २५ लाख रुपये घेऊन जाणारा भामटा जब्बार शेख हाच असल्याचे फिर्यादीने अाेळखले अाहे; तर दुसरा भामटा साेहेल सय्यद हा भाेंदूबाबाला मदत करणारा हाेता. तसेच राेशफखाँ जब्बारखाँ पठाण (रा. मलकापूर पांगरा, ता. सिंदखेडराजा) याच्यासह चाैघे अजून फरार अाहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच- २८, व्ही- ७८६८) पाेलिसांनी जप्त केली.
बातम्या आणखी आहेत...