आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यातील वीज खांब्याला धडक; वृद्धाचे डाेके फुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेश काॅलनीतील जिल्हा बँक शाखेच्या समाेरील रस्त्याच्या मधाेमध असलेल्या वीज खांबाला बुधवारी दुपारी १.१० वाजता निवृत्त प्राध्यापकाची माेटारसायकल धडकली. या अपघातात डाेक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपाचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले अाहे. शहरातील रस्त्यांच्या मधाेमध असलेले खांब नागरिकांसाठी जीवघेणे ठरत अाहेत.
काेर्ट ते गणेश काॅलनीच्या परिसरात तर अत्यंत धाेकादायक झाला अाहे. १३ दिवसांपूर्वी माेटारसायकलचालकाने धडक दिल्याने एक डाॅक्टरचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे अाता रस्ते माेकळे करण्यासह वाहतुकीला अडथळा ठरणारे खांब हटवणे गरजेचे अाहे.
मविप्र संस्थेतील इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक पीतांबर नथ्थू चाैधरी (वय ६४, रा. मुक्ताईनगर, मूळ राहणार लाेहारा, ता. पाचाेरा) हे बुधवारी दुपारी १.१० वाजता माेटारसायकलने (क्रमांक एमएच- १९, एडी- ६०३०) रिंग राेडकडून घराकडे जात हाेते. गणेश काॅलनीतील देशमुख प्लाझाच्या बाजूला अाणि जिल्हा बँक शाखेसमाेर असलेल्या वीज ट्रान्स्फाॅर्मरच्या खांबाला त्यांची माेटारसायकल धडकली. त्यामुळे त्यांच्या डाेक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या लहान मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात अाली. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक अाहे.

एकमेकांवर टाेलवाटाेलवी
रस्त्याच्यामधाेमध असणाऱ्या वीज खांबाविषयी अनेक संस्थांनी, नागरिकांनी महापालिका महावितरण कंपनीला अनेकवेळा निवेदने दिले. मात्र, महापालिका प्रशासन म्हणते हे काम महावितरण कंपनीचे अाहे. तर महावितरण कंपनी म्हणते की, हे खांब दुसऱ्या जागेवर हलवण्यासाठी मनपा जाेपर्यंत डिमांड नाेटचे शुल्क भरत नाही ताेपर्यंत खांब तसेच राहतील. या प्रकारामुळे अपघाताची मालिका सुरू असून अनेक निष्पाप जीवांना जीव गमवावा लागत अाहे.

गतिराेधकसाठी स्वाक्षरी माेहीम
काेर्टते गणेश काॅलनीपर्यंत कुठेही गतिराेधक नसल्याने तसेच रस्त्याच्या मधाेमध वीज खांब असल्याने अपघाताचे प्रमाण माेठ्याप्रमाणात वाढले अाहे. हा रस्ता वर्दळीचा असून गतिराेधक त्वरित उभारण्यात यावेत, या मागणीसाठी जानेवारी राेजी जळगाव जागृती मंचने स्वाक्षरी माेहीम राबवली हाेती. मंचाने प्रशासनाला १० दिवसांत गतिराेधक उभारण्याची मुदत दिली अाहे.

१३ दिवसांपूर्वी डाॅक्टरचा बळी
नूतनमराठा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ २५ डिसेंबरला रात्री वाजता डाॅ. रमाकांत पाटील यांना काेर्टाकडून रिंग राेडकडे जाणाऱ्या माेटारसायकलने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले हाेते. उपचार सुरू असताना २६ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...