आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठवडाभरानंतर हाॅकर्सचे स्थलांतर, फेरीवाला समितीत १२ ठराव मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहर फेरीवाला समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत १२ ठराव मंजूर करण्यात अाले. यात शहरातील गर्दीच्या ११ रस्त्यांवरील हाॅकर्सचे स्थलांतर आठवड्यानंतर करण्यावर शिक्कामाेर्तब झाले. हाॅकर्सने दुकानांचा अाकारही मर्यादीत ठेवण्याचा तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हाेणारी घाण कचरा पेटीत टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला. महापालिकेच्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी हाेणाऱ्या व्यवहारांना पायबंद घालण्याचे अावाहन करण्यात अाले.

मनपा प्रशासनाने मुख्य बाजारपेठेतील हाॅकर्सचे वेगवेगळ्या ११ ठिकाणी स्थलांतर करण्यासंदर्भात अाराखडा तयार केला अाहे. गुरुवारी अायुक्त संजय कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात अाली. या वेळी उपमहापाैर सुनील महाजन, गटनेते गणेश साेनवणे, मनसेचे ललित काेल्हे, मविअाचे नरेंद्र पाटील, अनंत जाेशी, शहर अभियंता दिलीप थाेरात अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित हाेते. या वेळी शहराच्या भल्यासाठी अाता हाॅकर्सनेही सकारात्मक भूमिका घेण्याचे अावाहन अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी केले. समितीतील सदस्य अॅड. हेमंत मुदलीयार, अनंत भाेळे, अॅड. सूरज जहांगीर यांनीही रस्ते माेकळे झाले पाहिजेत, न्यायालयाच्या अादेशाचेही पालन करावे, परंतु कारवाई करण्यापूर्वी हाॅकर्ससाठी पर्याय शाेधून त्यांचे स्थलांतर करावे, अशी भूमिका मांडली. तसेच गाेलाणी मार्केटमध्ये सुविधा नसल्याची तक्रार प्रभाकर तायडे यांनी केली. संजय साेनार यांनी बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस हाॅकर्स हलवल्यास व्यवसायावर परिणाम हाेण्याची शक्यता वर्तवली. नंदू पाटील,माेहन तिवारी, दिनेश हिंगणे यांनी सागर पार्कवरील हाॅकर्ससाठी तातडीने पर्याय देण्याची विनंती केली. ललित काेल्हे यांनी सागर पार्कवरील हाॅकर्सची बाजू लावून धरल्याने गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याची घाेषणा अायुक्तांनी केली. तसेच जागेसाठी हाॅकर्सने काेणालाही पैसे देऊ नयेत. केवळ व्यवसाय करण्यासाठी पालिकेची पावती फाडावी, असे अायुक्तांनी जाहीर केले.

असा आहे स्थलांतराचा आराखडा
सुरुवातीलासध्याचे ठिकाण, कंसात हाॅकर्सची संख्या, त्यानंतर पर्यायी स्थळ कंसात हाॅकर्सची संख्या अाहे.

फुले मार्केट (२१५) : पाेलिसठाणे भिंत ते जिल्हा परिषदेमागील स्वच्छतागृहापर्यंत (९७), जुन्या नगरपालिकेच्या मागील राेडवर दाेन्ही बाजूने (५५१), खान्देश मिल युनियन अाॅफिसची त्रिकाेणी जागा (१५), कबुतर खाना बाेळ (६०).
शिवाजीराेड (४५ फळविक्रेेते) (१० मसालाविक्रेते) : गाेलाणीमार्केट नवीन बी.जे.मार्केट.
सुभाषचाैक ते घाणेकर चाैक (४००) : गाेलाणीमार्केट बालाजी मंदिरामागील जागा, नवीन बी.जे.मार्केट.
बळीरामपेठ(३०० भाजीविक्रेते) : गाेलाणीमार्केट बालाजी मंदिरामागील जागा.
घाणेकरचाैक ते नेहरू पुतळा (३५) : यश प्लाझा बी.जे.मार्केट.
टाॅवरते चित्रा चाैक (१४ नास्ता विक्रेते) : कापडवालेजैन मंदिरामागे.
चित्राचाैक ते शिवाजी महाराज पुतळा (४० फळविक्रेते) : टेक्निकलशाळा भिंत.
मनपासमाेरील गाेलाणी मार्केट पार्किंगमधील हाॅकर्स : फायरअाॅफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी गाेलाणीतील हाॅकर्स सायंकाळी मनपासमाेरील हाॅकर्ससाठी.
गाेविंदारिक्षा स्टाॅप ते खान्देश माॅल, नेहरू पुतळ्याकडील गेटजवळील (२०) : गाेविंदारिक्षा स्टाॅप ते यश प्लाझा भिंत.
नेहरूचाैक ते रेल्वे स्टेशन (१५ टाइम झाेन)मध्ये सकाळीते १० वाजेपर्यंत संध्याकाळी ते १० वाजेपर्यंत.
स्वातंत्र्यचाैक ते प्रभात चाैक (५८) : बहिणाबाईउद्यानामागील बाजूस (येथे १०० जणांची व्यवस्था केली अाहे.)