आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकर्सनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सागरपार्क येथे हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ खडसे यांची त्यांच्या ‘मुक्ताई’ या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी संबंधित विक्रेत्यांनी गेल्या अाठवड्यापासून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ अाली अाहे. त्यामुळे सागर पार्क मैदानावर हातगाड्या लावू देण्यात याव्या, अशी विनंती केली.

सागर पार्क मैदानावर दारू पिऊन गाेंधळ घालून हाणामारी करण्याच्या दाेन-तीन घटना घडल्यामुळे महापालिका अाणि पाेलिसांनी तेथील विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास बंदी केली अाहे. तेथे काेणीही हातगाड्या लावू नये म्हणून सायंकाळी पाेलिस बंदाेबस्त लावण्यात येताे.

यासंदर्भात संबंिधत विक्रेत्यांनी शुक्रवारी पालकमंत्र्यांची भेट घेतली. याबाबत पाेलिस अधीक्षकांकडून माहिती घेऊ, असे खडसे यांनी विक्रेत्यांना सांगितले. दरम्यान, या विक्रेत्यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीदेखील भेट घेऊन हातगाड्या लावू देण्याची विनंती केली.
पालकमंत्र्यांशी चर्चा करताना सागर पार्कवरील हॉकर्सधारक, तर हॉकर्सच्या समर्थनार्थ मानवता ग्रुपतर्फे काव्यरत्नावली चौकात राबवलेल्या मोहिमेत स्वाक्षरी करताना जळगावकर.