आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट रुढी, परंपरांचे दहन करून शहरामध्ये होळी उत्सव साजरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, महिला मंडळे सामाजिक संस्थांतर्फे वाईट रुढी, परंपरांचे दहन करीत होळी साजरी करण्यात आली. तसेच विविध रंगांची उधळण करीत धूलिवंदनाचा आनंद लुटला. 
 
जेसीआयतर्फे वाईट प्रथांचे दहन 
जेसीआयतर्फेनूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात पारंपरिक होळी उत्सव साजरा करून वाईट अनिष्ट प्रथा, रुढींचे दहन करण्यात आले. याचवेळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या वेळी जेसीआय अध्यक्ष रफिक शेख, राजेश पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. सय्यद अल्ताफ, आबासाहेब पाटील, डॉ. संगीता महाजन, प्रमोद गहलोत, वरूण जैन, जीनल जैन, दीपक पाटील, राम पाटील, विकास पाटील, यशोधन पाटील, अानंद नागला, सचिन चिंचोरे, अजय पाटील, अलका पाटील, मीनाक्षी खरे, मयुरेश निंबाळकर, शेख झयान, आसिफ पठाण, डॉ. एल.पी.देशमुख, आर.बी.देशमुख उपस्थित होते. 
 
माहेश्वरी महिला मंडळ 
माहेश्वरीगणगौर महिला मंडळातर्फे रोटरी हॉल मायादेवीनगर येथे होळी महोत्सव साजरा झाला. यानिमित्ताने होळीचे गाणे नृत्य सादर करण्यात आले. जयश्री बियाणी, ज्योती कंवर, कल्पना पलोड, किरण कोगटा, कोमल जाजू, ममता अटल, मीतू मंडोरा, प्रिया देवपुरा, प्रियंका मंडोरा, रजनी मंडोरा, रुपाली लाठी, शिवानी जाजू, स्नेहा मंडोरा, मीनल लाठी, सीमा जाखेटे यांनी काम पाहिले. 
 
भाजपातर्फे टिळा होळी साजरी 
भारतीयजनता पार्टी जिल्हा महानगर दिव्यांग अाघाडीतर्फे टिळा होळी साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवा पर्यावरण संतुलन राखण्याचा संदेश दिला. या वेळी सुनील माळी, शिवदास साळुंखे, मनोज भांडारकर, नितीन गायकवाड, अमित चौधरी, गणेश पाटील, नीलेश झोपे उपस्थित होते. 
 
राष्ट्रीय सेनेंतर्गत नैसर्गिक रंग 
गिरीजाबाईनथ्थूशेठ चांदसरकर माध्यमिक शाळेत राष्ट्रीय सेनेंतर्गत नैसर्गिक रंग तयार करणे हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका सुरेखा चौधरी अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वनमाला जैन, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक लागवड अधिकारी एम.डी. नेमाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आर.एन.पावरा यांनी सूत्रसंचालन केले. 
 
जे.के. इंग्लिश स्कूल 
जे.के. इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांनी कचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी केली. पन्नालाल चव्हाण, चंद्रकला चव्हाण यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. या वेळी संस्कृती श्रीवास्तव, अंजली चव्हाण, हरीश गोयल, मयूर तायडे, प्रणव वाणी, खुशी मौर्य, आस्मा हरीश गोयल, मयूर तायडे, प्रणव वाणी, सना चौधरी, प्रेम कोळी, नीलेश गवळी उपस्थित होते. 
 
‘साहस’तर्फे ‘नूतन’मध्ये धूलिवंदन 
साहस फाउंडेशन नूतन मराठा कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तनारी शक्ती धूलिवंदनाचा कार्यक्रम नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. या वेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात १५०० मुली महिलांचा समावेश होता. आमदार सुरेश भोळे, अॅड. विजय पाटील, मनोज वालेचा, फारुख शेख, शोभा चौधरी, मंगला बारी, वैशाली विसपुते, सविता बोरसे, जयश्री पाटील, जयश्री भावसार, संगीता पाटील, वैशाली पाटील आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...