आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडपट न्यूयार्कसह जळगावातही प्रदर्शित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - न्यूयार्क, लंडनमध्ये रिलीज होणारे चित्रपट त्याच दिवशी जळगावातही दिसणार आहेत. ‘टुके’ प्रोजेक्टर’ तंत्रज्ञानामुळे बॉलीवूडप्रमाणे हॉलीवूड चित्रपटही रिलीज होताच जळगावात दिसणार आहेत.

दूरचित्रवाणी, इंटरनेट आणि सीडीमुळे चित्रपटगृहांकडे प्रेक्षक कमी झाले आहेत; परंतु दिग्दर्शकांकडून वापरले जाणार्‍या तंत्रज्ञानामुळे मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याचा वेगळाच आनंद प्रेक्षकांना मिळत आहे. चित्रपटागृहामंध्ये एकेकाळी फिल्म पेट्यांचा वापर केला जात होता. त्याची जागा सॅटेलाइट पिक्चरने घेताच बॉलीवूड चित्रपट रिलीज होण्याच्या दिवशीच पाहण्यास मिळायला लागले. आता क्रिस्टी सोलारिया वन या कंपनीच्या ‘टुके’ प्रोजेक्टरद्वारे हॉलीवूडचे चित्रपटही सॅटेलाइटद्वारे डाऊनलोड करता येणार आहेत. जळगावातील नटवर मल्टिपेल्क्समध्ये शुक्रवारी रिलीज होणारा एलिजीयम हा हॉलीवूडचा चित्रपट जळगावात रिलीज होणार्‍या दिवशीच दिसणार आहे.

एचडी (हाय डेफिनेशन)मुळे थ्रीडी आणि टुडी चित्रपट पाहण्याचा वेगळाचा आनंद नवीन तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांना मिळतो आहे. दर आठवड्याला मुंबई येथून नवीन चित्रपटांची हार्डिस्क चित्रपटगृहांना पाठवली जाते. हार्डिस्कमध्ये 7 ते 10 जीबीमध्ये चित्रपट बसविला जात होता. आता ‘टुके’ प्रोजेक्टरमुळे 200 ते 250 जीबी पर्यंत चित्रपट बसवला जाईल. त्यामुळे चित्रपटाचा आवाज तसेच चित्र पाहण्यास वेगळेच आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे.

तंत्रज्ञानाचा आनंद
मुंबईसारख्या शहराप्रमाणे चित्रपटगृहांची व्यवस्था जळगावात केली आहे. नवीन थिएटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून चित्रपटांचा खरा आनंद प्रेक्षकांना देण्याचा प्रय} करीत आहोत. मेहुल त्रिवेदी, संचालक, नटवर थिएटर

तंत्रज्ञान काय?
टुके प्रोजेक्टरद्वारे चित्र पाण्यासारखे अथवा काचेसारखे स्पष्ट दिसणार आहे. तसेच 5.1 या साउंड सिस्टिमच्या पुढे जाऊन 7.1 डॉब्ली साउंड सिस्टिममुळे चित्रपट पाहण्याचा आनंद अधिक असणार आहे. विशेषत: हॉलीवूडचे हॉरर, अँक्शन आणि बॉलिवूडचे अँक्सनपट चित्रपट पाहताना प्रत्यक्ष घटनास्थळासमोर असण्याचा आभास प्रेक्षकांना होईल.