जळगाव - वाढलेल्या वैद्यकीय सोयी-सुविधा आणि माता मृत्यूसंदर्भात वाढलेली जनजागृती यामुळे घरगुती प्रसूतीचे प्रमाण घटले आहे. असे असले तरीही पालिकेच्या जन्म-मृत्यू दाखले देणाऱ्या विभागात घरगुती प्रसूती झाल्याचे दाखवून सोयीच्या तारखांचे जन्मदाखले मागणाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जन्म-मृत्यूचे दाखले वितरित करण्यात येतात. यासाठी मक्तेदार नियुक्त करण्यात आला असला तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. महापालिका हद्दीत होणाऱ्या जन्म-मृत्यूच्या नोंदी रुग्णालय स्मशानभूमीच्या माध्यमातून घेण्यात येतात. अलीकडे मात्र घरीच प्रसूती झाल्याची बतावणी करीत जन्म दाखले मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आवश्यक पुरावे सादर करता दाखल्यांची मागणी करणारी मंडळी पालिकेच्या यंत्रणेशी वाद घालून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
नियमानुसार घरी प्रसूती झाल्यास २१ दिवसांच्या आत संबंधित पालकांनी अपत्य जन्माला आले असल्याचा
आपल्या भागातील नगरसेवकाचा दाखला आणणे गरजेचे असते. याचबराेबर त्या भागातील डॉक्टरने मुलाची तपासणी केल्याचा दाखला, आई वडिलांच्या ओळखीचा पुरावा जोडावा लागतो. या प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती पालिकेत ठळकपणे दर्शवण्यात आल्याने दाखले मागणाऱ्यांचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांशी वारंवार वाद होत असल्याचे निदर्शनास येत आहे.