आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीनंतर घर खरेदीत गुंतवणूक करण्यासाठी तरुणांचा वाढता कल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रत्येकाच्या आयुष्यात नोकरी, घर, लग्न आणि परिवार याबाबींना खूप महत्त्व आहे. यासाठी प्रत्येकजण स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. चांगल्या पगाराची नोकरी पटकावून सुंदर, अलिशान घर घेण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. त्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. एकदाचे घर बनविले की आयुष्यभर टेन्शन नसते, असे तरुणपिढीचे म्हणणे आहे. पूर्वी लोक नोकर, लग्न, परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण व लग्न, रिटायर्डमेंटला घर करणे असा सगळा प्रवास असायचा. मात्र, हे चित्र आता बदलले आहे. तरूणांमध्ये सामाजिक, आर्थिक बदल मोठ्याप्रमाणावर होताना दिसत आहेत.
आपले स्वत:चे घर असावे हे सगळ्यांचे स्वप्न असते. प्रत्येक व्यक्ती त्यादृष्टीने पैशांची बचत करत असतो. घर ही सगळ्यात मोठी गरज असल्याने त्याचा तो पहिल्यांदा विचार करतो. आपापल्या बजेट आणि गरजेनुसार घर घेण्याचे ठरवतो. कोणी फ्लॅट, कोणी अपार्टमेंट तर कोणी बंगल्याच्या रुपात घर घेतो. आता तरुण मुल आणि मुली नोकरीला लागले की ते घर घेण्याचा निर्णय घेतात. लग्नाच्या अगोदरच घर झाल्यास नंंतरचे आयुष्य सुखकर जाते. घर खरेदी करणे आयुष्यभराची गुंतवणूकच असते. ते घेण्यासाठी बॅँकांकडून सहज कर्ज उपलब्ध होते. बरेच जण घर खरेदी करणे म्हणजे गुंतवणुकीचा पर्याय समजला जात आहे. प्रापर्टीमध्ये गुंतवणूक करणारे 25 ते 35 वयोगटातील तरुणांचा अधिक सहभाग असल्याचे या क्षेत्रातील नागरिकांचे म्हणणे आहे.
‘2 बीएचके’ची मागणी - युवकांमध्ये 2 बीएचके घरे खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. ते घर गुंतवणूक करण्यासाठी देखील सोयीचे आहे. त्याची विक्री करून परतफेडदेखील चांगली मिळू शकते. किफायतशीर दरात घर खरेदी करून व्रिकीसाठी परवडते. भाड्याने देण्यासदेखील उत्तम असते. गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असल्याने त्यावर कर्जदेखील लवकर उपलब्ध होते.
पाहिजे सुरक्षित भविष्य - युवकांचा घर आणि जमिनी घेण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजकाल नवरा, बायको दोघेही नोकरदार असल्याने प्रत्येक जोडी लग्नानंतर पहिल्यांदा घराला महत्त्व देत आहेत. त्याचप्रमाणे जागा कशी आहे, आजूबाजूचे शेजारी कसे आहेत, सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत की नाही? याकडे देखील त्यांचे बारीक लक्ष असून त्यांच्या मनाप्रमाणे ते घराला पसंती देत आहेत.
* मी आताच माझ्या आयु्ष्यात कुठे व्यवस्थित स्थिरावलो आहे. त्यामुळे माझा पहिला विचार घर घेण्याचाच होता म्हणून मी एक फ्लॅटदेखील नोंदवला असून आता त्याच्या प्रक्रिया पूर्ण करीत आहे. घराचे भाडे भरण्यापेक्षा बॅँकेचा हप्ता भरलेला बरा. - प्रशांत पाटील, नोकरदार
* माझे नुकतेच लग्न झाले, तेव्हाच मी ठरवले की आता स्वत:चे घर घेणे आवश्यक आहे. आज माझे वय 28 आहे. मी लगेच घरात गुंतवणूक केली. मी लग्नाआधी नोकरी करायचो. आता जमा केलेला पैसा घरात लावल्यामुळे डोक्याला ताण नाही. आता आमचा येणारा पगार पूर्ण मुलांच्या भविष्याला आणि आमच्या म्हातारपणासाठी सांभाळून ठेवता येईल. - दीपाली पाराशरकर, गृहिणी
* लोक गुंतवणूक म्हणून नक्कीच घरांकडे आणि जमिनींकडे पाहत आहेत. शहरात जास्त करून लोकांची भूमिका ही प्लॉट आणि जमिनी घेण्याकडे असून त्यांची विक्रीदेखील खूप आहे. त्याचप्रमाणे फायदा मोठा असल्याने युवकांचे घरे घेण्याचे प्रमाण खूप आहे. - नरेश खंडेलवाल, अध्यक्ष, इस्टेट ब्रोकर असोसिएशन