आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात १० लाखांचे घर जाणार १४ लाखांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दरवर्षाप्रमाणे जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात वाढ झाली. यंदा, मात्र महापालिका हद्दीतील आरसीसी बांधकाम दरात दुप्पटीने वाढ झाली. त्यामुळे जळगाव शहरात साधारणपणे १० लाख रुपयांना मिळणारी घरे आता १५ लाखांपर्यंत पोहोचतील. शुल्कवाढीचा बांधकाम व्यवसायासह सामान्यांच्या घर घेण्याच्या स्वप्नांवर परिणाम होणार आहे.
सध्या रिअल इस्टेट मार्केट मंदीत आहे. त्यातच गुरुवारी मुद्रांक शुल्कात वाढ झाल्यानंतर आणखीच भर पडली आहे. दरवर्षी वाढणारे मुद्रांक शुल्क १०-१२ टक्क्यांनी वाढते. तर बांधकामावरील दरही टक्क्यांनी वाढतात. यावर्षी मात्र बांधकाम दरात दुप्पट-तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात घर घेणे अतिशय महाग जाणार आहे.
ग्राहकांवर अन्यायकारक निर्णय
^सामान्य ग्राहकांवर अन्याय केल्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या महसुलात अधिक भर पाडण्यासाठी अधिक वाढ करण्यात आली आहे. गनीमेमन, बांधकामव्यावसायिक

सामान्यांच्या आवाक्याबाहेर
^वाढीव बांधकाम दरामुळे प्रत्येक नवीन घराच्या किमतीत वाढ होईल. ही वाढ ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर परवडणारे नाही. हातीमअली, बांधकाम व्यावसायिक
वाढ अशी
ग्रामीण भागात बिनशेती, महामार्गालगत बिनशेती गावठाण १३ टक्के, प्रभावक्षेत्रात शेती, बिनशेती आणि गावठाणचे १० टक्के, मनपा हद्दीत दुकान, वरचा मजला, निवासी इमारत आणि जमिनीचे १० टक्के.
असे आहेत वाढीव दर (महापालिका हद्दीतील बांधकाम दर प्रतिचौरस मीटरसाठी)
प्रकार गेल्या वर्षाचे दर वाढवलेले दर
आरसीसी१० हजार २०० २२ हजार
इतर पक्के हजार २०० १९ हजार ८००
अर्धे पक्के हजार ५०० १३ हजार २००
कच्चे हजार २०० हजार ९००
प्रॅक्टिकली अशक्य
शासनाने एकदम वाढवलेले हे दर धक्कादायक आहेत. सरासरी विचार केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करणे शक्य वाटत नाही. जानेवारी रोजी दर वाढतातच. मात्र, नंतर कमी झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे सध्या वाढलेले दर प्रत्यक्षात अशक्य असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

मुंबईप्रमाणे वाढ
जळगावात वाढलेले बांधकाम दर हे मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांशी तुलना करणारे आहेत. एकाच रात्रीतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.