आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरभाडे भत्ता मिळवून देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. अपूर्व हिरे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्या वेळी त्यांनी घरभाडे भत्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.

तसेच त्यांनी पद्मालय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा केली. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. शिक्षक आमदारांनी गठित केलेल्या प्राथमिक विभाग समन्वय समितीतर्फे या वेळी मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

घरभाडे भत्ताप्रकरणी चौकशीची मागणी
आमदार हिरे यांनी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील यांच्या दालनात शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यातील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, यासबबीवरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद केला आहे. चौकशी न करता ही कार्यवाही झाली असल्याने याप्रकरणाची चौकशी करून घरभाडे भत्ता सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. समन्वय समितीचे अध्यक्ष किशोर पाटील, विक्रम सोनवणे, संभाजी पाटील, अजय देशमुख, पी.डी.पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा शिक्षकांसाठी झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पद्मालय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात आमदार हिरे यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षक गटातून क्षमा साळी प्रथम, सुनील पवार द्वितीय, विक्रम सोनवणेंनी तृतीय क्रमांक मिळवला. माध्यमिक गटातून दिवाकर बडगुजर प्रथम, टी.एम.चौधरी द्वितीय, अमित पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.महाविद्यालयीन गटात प्रा.बालाजी पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी श्याम पाटील, संभाजी पाटील, वाय.बी.पाटील, अजय देशमुख, पी.डी.पाटील, किशोर पाटील उपस्थित होते.