आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराचे छत काेसळून चाैघांचा झाेपेतच मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील पाराेळ्याची दूर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळा- मातीच्या घराचे छत काेसळून एकाच कुटुंबातील चाैघांचा झाेपेतच गुदमरून मृत्यू झाला. शेजारी मदतीला धावल्याने गंभीर जखमी झालेल्या एका मुलाला वाचवण्यात यश मिळाले. जळगाव जिल्ह्यातील पाराेळा येथील काझीवाडा परिसरात शुक्रवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली.   
 
काझीवाड्यात भिकन नथ्थू काझी हे पत्नी व पाच मुलांसह राहतात. त्यांचा ब्लँकेट विक्रीचा व्यवसाय अाहे. वर्षभरात किमान अाठ महिने ते बाहेरगावी असतात. त्यांचे चार खाेल्यांचे घर अाहे. गुरुवारी रात्री ११ वाजता पत्नी सायराबी, मुलगा माेईनाेद्दीन, हाशीम, शबनम हे चाैघे जमिनीवर, तर वासीम हा पलंगावर झाेपलेला हाेता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मातीच्या छताला तडा गेल्याने चाैघांच्या अंगावर काेसळले. मातीखाली गाडले गेल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला, तर पलंगावर झाेपलेला वासीम हा गंभीर जखमी झाला. पहाटे या भागातील मुस्लिम समाजबांधव अजानसाठी उठलेले हाेते. घराचे छत काेसळण्याचा अावाज एेकताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील नागरिकांची मदत घेऊन सर्वांनी माती बाजूला सारली. ढिगाऱ्याखालील सायराबी, हाशीम, माेईनाेद्दीन, शबनम यांना बाहेर काढले. परंतु, ताेपर्यंत श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला हाेता. भिकन काझी मात्र बाहेरगावी असल्यामुळे या दुर्घटनेतून बचावले.
 
पक्क्या घराचे हाेते स्वप्न  
भिकन यांनी व्यवसाय करून पाचही मुलांचे शिक्षण केले. बचत करून घराचे काम टप्प्याटप्याने करण्याच्या संदर्भात त्यांनी पत्नी सायराबीशी चर्चा केली हाेती. गेल्या वर्षी घराच्या पुढील भागात पत्रे टाकून डागडुजी केली. माेठ्या मुलाचा पगार सुरू झाला की पक्के घर बांधू, असे त्यांचे स्वप्न हाेते. मात्र, तत्पूर्वीच पत्नी, दाेन मुले व एक मुलगी काळाने हिरावून नेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डाेंगरच काेसळला.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...