आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अँलोपॅथी’च्या वापरास परवानगी द्यावी; डॉक्टारांचे काम बंद आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यातील होमिओपॅथीच्या डॉक्टरांना रुग्णहिताच्या दृष्टीने अँलोपॅथी चिकित्सा पद्धतीचा वापर करण्यास परवानगी द्यावी, यासह गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलन पुकारले होते. जिल्ह्यातील डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
होमिओपॅथी डॉक्टर्स संघटना व चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजतर्फे डॉक्टर व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 2 वाजता मूकमोर्चा काढला होता. मोर्चेक र्‍यांनी जिल्हाधिकारी क ार्यालयाबाहेर मनोगत व्यक्त करून उपजिल्हाधिकारी साजीदखान पठाण यांना निवेदन देण्यात आले. संघटनेतर्फे 9 ते 11 डिसेंबरदरम्यान नागपूर येथे उपोषण करण्यात येणार असून 11 रोजी अन्याय निवारण संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. अरुण भस्मे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रकाश भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुभाष देशमुख, डॉ. रितेश पाटील, डॉ. प्रशांत मंत्री, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. मनोज विसपुते व विद्यार्थी उपस्थित होते.