आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉर्टिकल्चर ट्रेन 20 ऐवजी 22 जानेवारीला धावणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - जिल्ह्यातील केळी उत्पादक मोठ्या आतुरनेते वाट पाहणारी हॉर्टिकल्चर ट्रेन आता 20 जानेवारीऐवजी 22 जानेवारीला केळी घेवून दिल्लीकडे रवाना होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम आणि कापणीयोग्य केळीचे प्रमाण कमी असल्याने तारखेत हा बदल झाला आहे.
यापूर्वी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला ट्रेन रवाना करण्याचे नियोजन होते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कृषीमंत्री पवार यांचे येणे रद्द झाले. खासदार हरिभाऊ जावळे आणि महाबनानाचे अध्यक्ष ज्ञानदेव महाजन, अखिल भारतीय केळी महासंघाचे अध्यक्ष डी. के. महाजन, वसंतराव महाजन आदींनी शेतक-यांची बैठक घेवून ट्रेनला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी 20 जानेवारीचा मुहूर्त काढला होता.
त्यानुसार तयारी सुरू झाली होती. मात्र, 90 कंटनेर भरण्यासाठी लागणारी केळी काही प्रमाणात कमी पडत असल्याने हा कार्यक्रम आता 20 ऐवजी 22 जानेवारीला होणार असल्याची माहिती महाबनानाचे अध्यक्ष ज्ञानदेव महाजन यांनी दिली. प्रल्हाद बोंडे, दत्तू महाजन, सोपान पाटील, दिलीप साबळे, हृदयेश पाटील, जलाल शेख व शेतकरी उपस्थित होते.
स्थानिक पातळीवर कंटेनर द्या - तालुक्यातून केळी भुसावळला नेणे कठीण आहे. शेतकरी वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करतो. रस्त्याच्या दुर्दशेमुळे केळीची प्रत खराब होईल. कंटेनरमध्ये केळी भरण्यासाठी कुशल मजूर लागतील. सावदा, निंभोरा, रावेर मालधक्क््यावर कंटेनर उपस्थित करून द्यावेत. -- भागवत पाटील, अध्यक्ष, केळी उत्पादक महासंघ
शेतकरी हिताचा निर्णय घेवू - केळी बेल्टमधून हॉर्टिकल्चर ट्रेन रवाना होणे गौरवाची बाब आहे. शेतक-यांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी कंटेनर उपलब्ध करून देण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्यासाठी महिनाभरापासून रेल्वे मंत्रालयात प्रयत्न सुरू आहेत. - हरिभाऊ जावळे, खासदार रावेर