आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्‍याच रुग्णालयात तपासणीएवढी व्हिजिट फी घेतात डॉक्टर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अापल्याच रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाची दरराेज तपासणी करण्यासाठी डाॅक्टर्स तपासणी फी एवढी व्हिजिट फी घेतात. तसेच रुमभाडेदेखील शहरातील लाॅजिंग, हाॅटेलपेक्षाही महाग अाहे. त्यामुळे अनेक रुग्णांना माेठा अार्थिक भुर्दंड साेसावा लागत अाहे.
रुग्णांना उपचारासाठी अापल्याच रुग्णालयात दाखल केल्यानंतर डाॅक्टर विविध सुविधांसाठी पैसे अाकारतात. त्याचा एक भाग हा रुग्णांना भेटीसाठी घेतली जाणारी व्हिजिट फी हा अाहे. रुग्णालयात अाकारली जाणारी व्हिजिट फी बिलाची रक्कम फुगवते. दिवस दाखल असलेल्या रुग्णांकडून प्रतिदिवस ३०० रुपयांप्रमाणे असे एकूण १८०० रुपये केवळ रुम व्हिजिट फी म्हणून अाकरले जात असल्याची वस्तुस्थिती अाहे. इतर गाेष्टींसाठी फी घेतली जात असल्याने डाॅक्टरांनी व्हिजिट घेऊच नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त हाेत अाहे.

डाॅक्टरांनी उभारलेल्या टाेलेजंग हाॅस्पिटलमध्ये रुग्णांकडून घेतले जाणारे रुमभाडे हे शहरातील लाॅजिंग-बाेर्डिंग, महागड्या हाॅटेलपेक्षाही अधिक अाहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांना १० बाय ची एक स्पेशल रुम दिली जाते; तर १० बाय १२ च्या रुममध्ये तीन काॅट टाकून तेथे दाेन किंवा तीन रुग्णांना ठेवण्यात येते. त्याला जनरल वाॅर्ड, असे नाव दिले जाते. स्पेशल रुमसाठी ५०० पासून ते हजारांपर्यंत तर जनरलसाठी ३०० पासून ते ५०० रुपयांपर्यंत प्रतिदिवस भाडे अाकारले जाते. हजार भाडे अाकारणाऱ्या डाॅक्टरांना एकाच रुमपासून महिन्याकाठी ३० हजार तर जनरल वाॅर्डसाठी ५०० रुपये अाकारणाऱ्यांना तीन काॅटपासून महिन्याकाठी ४५ हजार उत्पन्न मिळते.
गुंतवणुकीचा बाऊ
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊन स्वत: गुंतवणूक केली असली, तरी अनेक नवखे डाॅक्टर अनेक वर्षांचे शिक्षण, माेठी गुंतवणूक, बँकेचे हप्ते यांचा बाऊ करत स्वत:चा नफा काढून कर्जाचा सर्व बाेजा रुग्णांवर टाकून माेकळे हाेतात. जेवढी अधिक गुतंवणूक तेवढी रुग्णांची अार्थिक लूट अधिक असल्याचे अनुभव काही रुग्णांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, डॉक्‍टरांनी दिलेले बिल..