आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहातील विद्यार्थिनींनी गिरवले अात्मसंरक्षणाचे धडे, कायद्यासंदर्भातही मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : समाज कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात बुधवारी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण अाणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे धडे देण्यात आले. 
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मागसवर्गीय मुलींच्या वसतिगृहात कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे सहायक अायुक्त याेगेश पाटील, समाजकल्याण निरीक्षक ठिंगळे तसेच अायाेजक गृहपाल वैशाली पाटील उपस्थित हाेते. 
 
याेगेश पाटील म्हणाले, मुलींनी अापल्यातील अात्मसन्मान कायम जागृत ठेवला पाहिजे. समाजात वावरताना हा आत्मसन्मान कधीच खचू देऊ नका. तसेच समाजाकडे सकारात्मक दृष्टिकाेनाने पाहिल्यास चांगल्या गाेष्टी तुम्हाला कळतील. तसेच आपल्या सकारात्मक विचारसरणीचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर हाेत असताे तर काेणतीही गाेष्ट करताना स्वत:मध्ये अात्मविश्वास असणे गरजेचे अाहे, असे ते म्हणाले. द्या, मदत करा, असे सांगितले.
करिअरकडे लक्ष द्या.
 अाकर्षणात वाहवत जाता स्वत:चे भविष्य घडवा, असा सल्लाही दिला. प्रा.अस्मिता धनवंत सरवैय्या यांनी महिलांसाठीचे कायदे, शिलांबरी जमदाडे यांनी सामाजिक जनजागृती, तर प्रा.डाॅ. श्याम साेनवणे यांनी व्यक्तिमत्त्व विकास याविषयावर मार्गदर्शन केले. 

प्रतिकाराच्या विविध टिप्स्
विनाेद अहिरे यांनी कराटे प्रशिक्षण दिले. काेणी छेड काढल्यास किंवा शारीरिक त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा, अापल्या हातांच्या पंजेच्या साहाय्याने कशा प्रकारे प्रतिकार करू शकतात, याबाबतच्या विविध टिप्स् दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...