आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तीशाळा शिक्षक करणार आत्मदहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्ह्यातील बंद वस्तीशाळांमधील 41 शिक्षकांचे अद्याप समायोजन झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक निमशिक्षक संघातर्फे मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अनिल लांडगे यांना निवेदन देण्यात आले. हा प्रश्न 15 जानेवारीपर्यंत न सोडविल्यास आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.

निवेदनाचा आशय असा : शासनाने शिक्षणापासून वंचित असलेल्या 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 231 वस्तीशाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये निमशिक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे सहा हजार मुले शिक्षणाच्या प्रवाहात आले. प्रशासनातर्फे कालांतराने 140 शाळा नियमित करण्यात आल्या. दुसरीकडे 101 शाळा बंद करण्यात आल्या. या शाळेतील 60 शिक्षकांना जिल्हा परिषदेत सामावून घेण्यात आले असून उर्वरित 41 शिक्षकांची प्रतीक्षा यादी तयार आहे. त्यानंतर अद्यापही या शिक्षकांचे समायोजन झालेले नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना जिल्हा परिषद आस्थापनेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक निमशिक्षक संघाने केली आहे. प्रश्न न सोडविल्यास 15 जानेवारीला आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक नेते आर. ए. नांद्रे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कंखर, तालुकाध्यक्ष सुभाष पगारे, संभाजी देवरे, संजय अहिरराव, प्रकाश खैरनार, भीमराव चौरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक निमशिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.