आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hot Clothing Sweaters, T shirts Crazy Of Winter Season

गरम कपड्यांमध्ये स्वेटर, टी-शर्टची क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गरमकपड्यांमध्येही वेगवेगळया क्रेझ बाजारात दिसू लागल्या आहेत. त्याकडे युवकांचा विशेष कल दिसून येत आहे. तरुणांसाठी टी-शर्ट सारखे स्वेटर आणि अंब्रेला टाइपच्या स्वेटरला पसंती आहे. तर हाफ जॅकेटलाही मागणी चांगली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
डिसेंबर अर्धा संपण्यात आला. तरीदेखील थंडीची चाहूल जाणवत नव्हती. अवकाळी पावसानंतर सोमवारपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मध्येच ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे थंडी गायब झाली होती. थंडी जाणवू लागताच जीएस ग्राउंड येथे तिबेटियन विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर गरम कपड्यांच्या खरेदीसाठी गेल्या आठवडाभरापासून गर्दी वाढली आहे. सध्या वेगवेगळया टी-शर्टची तरूणांमध्ये क्रेझ आहे. त्याचपध्दतीने स्वेटरदेखील बाजारात आले आहे. जून्या पध्दतीच्या स्वेटरला पूर्ण विराम देत टी-शर्ट सारखे असलेल्या स्वेटरला पसंती मिळते आहे. त्यात चेक्स, डक शेफ, लाईट असे प्रकार आहेत. तर महिलांसाठी शक लाँग लेडिज अंब्रेला टाइपचे स्वेटर यंदा पहिल्यांदाच बाजारात आले आहे. त्यालाही महिलांकडून चांगली मागणी आहे. शॉल आणि मफलरमध्येही अनेक प्रकार दिसून येत आहे. बहुतांशी स्वेटरला टोपी देखील आहे. त्यामुळे वेगळी टोपी घेण्याची आवश्यकता नाहीये.
मोदीजॅकेटलाही मागणी : सध्यामोदी जॅकेटची चलती आहे. पण ते जॅकेट विक्रेत्यांकडे नाही. पण इतर दुकानांवर शॉर्ट जॅकेटच्या स्वेटरलाही तेवढीच पसंती आहे. महाराष्ट्रीय विक्रेत्यांकडे आणि कपड्यांच्या दुकानांवर हे जॅकेट दिसून येत आहे. तथापि, महामार्गालगत मूजे महाविद्यालयाजवळ परराज्यात आलेल्या विक्रेत्यांनी वेगवेगळया प्रकारच्या जॅकेट विक्रीसाठी आणली आहे.
- दरवर्षाप्रमाणे १५ तिबेटियन विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटली असून सर्व दुकानांवर एकच भावात गरम कपड्याची विक्री होईल. २४० रूपयांपासून एक हजार रूपयांपर्यंत स्वेटर विक्रीसाठी असून गेल्या आठवडाभरापासून गर्दी वाढली आहे. डिसेंबर अथवा जानेवारीशेवटपर्यंत दुकाने असतील. डोलमा,तिबेटियनविक्रेती
शिवतीर्थ मैदानावरविक्रीस आलेले फॅशनेबल स्वेटर
{मुलांना उबदार कपडे घाला { उकळलेले गार पाणी प्या. { संतुलित आहारावर भर द्या.
- वातावरणात बदल अपेक्षित आहे. पण अवेळी पाऊस पडल्याने वात, सर्दी-खोकल्यासोबतच मलेरिया, टाॅयफॉइडचे रुग्ण वाढणार आहे. उबदार कपडे, गरम पाण्याचा वापर आणि संतुलित आहारावर भर दिला पाहिजे. सकाळी फिरायला जातानाही गरम कपडे वापरा. डॉ.धीरज देवरे